नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , घाटकूरोडा येथे परवाना धारक राशन दुकानदार डोंगरवार यांनी केला राशन घोटाळा नागरिकांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार – जनता टाइम्स न्यूज

घाटकूरोडा येथे परवाना धारक राशन दुकानदार डोंगरवार यांनी केला राशन घोटाळा नागरिकांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

घाटकूरोडा येथे परवाना धारक राशन दुकानदार डोंगरवार यांनी केला राशन घोटाळा नागरिकांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया)

 

तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत घाटकूरोडा येथे राशन दुकानदार शिधापत्रिका धारकांना रेशन वितरित न करता परवानाधारक राशन दुकानदार लाभार्थ्यांच्या मालाची स्वतः उचल करुन विल्हेवाट लावत असल्याची तक्रार गावातील नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांच्याकडे केली आहे.

घाटकूरोडा येथिल परवाना धारक राशन दुकानदार सुरेश महादेव डोंगरवार परवाना क्रमांक (FPS ID 150737000117 ) हे नागरिकांना शासनाकडून शिधापत्रिका धारकांना प्राधान्य कुठुम्ब प्रती व्यक्ती 5 किलो याप्रमाणे तर अंतोदय कार्डवरती प्रती कार्ड 35 किलो शिधा देण्यात येतो.

घाटकुरोडा येथिल राशन दुकानदार सुरेश डोंगरवार हे शिधापत्रिका धारकांना बरोबर शिधा देत नसुन राशनकार्ड मधिल एखादा व्यक्ती मृत झाल्यास त्याच महिनापासून त्यांचे नावाने मिळणारे राशन परिवारातील त्या शिधा पत्रिकेत असलेला नागरिकांना देत नसुन तेच राशन स्वतःकडे ठेवत असल्याची तक्रार व त्याच बरोबर लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींच्या नावाने मिळत असलेले राशन लग्न झालेल्या महिन्यापासूनच परिवारातील व्यक्तींना देत नसुन तेही स्वतःकडे ठेवत असल्याची तक्रार तसेच नव्याने शिधा पत्रिकेत समाविष्ठ करण्यात लाभार्थ्यांच्या नावाचे राशन त्यांना देत नसुन शिधा पत्रिकेनुसार त्यांच्या परिवारातील व्यक्तींचे बायोमॅट्रिक करुन घेत असतात, परंतु त्या नविन लाभार्थ्यांच्या नावाचे राशन 4 ते 6 महिने देत नाही स्वतःकडेच ठेवत असतात.

लाभार्थ्यांनी उचल केलेल्या मालाची पावती देण्यात येत नाही, धान्य साठवण्यासाठी दुकानदाराकडे वेगळे गोदाम नाही, सूचना फलकावर माहिती, वजन मापे, ध्यान्य वाटपाची वेळ प्रकाशित करण्यात येत नाही.

BPL व अंत्योदय शिधा पत्रिका धारकांनी चालू महिन्याचे राशनाची उचल न केल्यास पुढच्या महिन्यात देण्यात येत नाही. उलट परवानाधारक दुकानदार व त्यांची पत्नी लाभार्थ्यांना अभद्र भाषेत बोलत असल्याची तक्रार गावातील शिधापत्रिका धारकांनी जिल्हापुरवठा अधिकारी गोंदिया यांच्याकडे संबंधित राशन दुकानदार यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी केलेली आहे.

त्यानुसार तिरोडा तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक व त्यांच्या नियंत्रण पथकाने घाटकुरोडा गावात जाऊन प्रत्यक्षात संबंधित नागरिकांना बोलावून मौका चौकशी केली व तक्रारीच्या अनुषंगाने नियंत्रण पथकाने रेकार्ड तपासले असता सर्व रेकार्ड व्यवस्थित आढळून आल्याचे माध्यमाला पुरवठा निरीक्षक राठोड यांनी कळविले आहे. परंतु नागरिकांनी केलेले आरोप, बयान दिलेल्या तक्रारीला अनुसरून असल्याचे अहवाल व मौका चौकशी अहवाल वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे आवश्यक कार्यवाहीस पाठवण्यात येईल असे कळविले आहे.

✍️जनता टाइम्स✍️

🎤जटा TV🎤

इंसाफ चाहता है इंडिया ……

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed