खेडी येथे रक्तदान शिबीर संपन्न: 25 रक्तदात्यांनी केले रक्तदान..
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
खेडी येथे रक्तदान शिबीर संपन्न: 25 रक्तदात्यांनी केले रक्तदान..
राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : दिनांक १९ मे २०२४ रोज रविवारला सकाळी ९ ते २ वाजता पर्यंत युवामित्र परिवार खेडी आणि जनमैत्री बहुद्देशीय संस्था खेडी यांचेद्वारे ग्रामपंचायत खेडी या ठिकाणी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथील शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये खेडी गावातील एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये जनमैत्री संस्थाचे संस्थापक स्वप्नील चौधरी व श्रीकृष्णा काळे, शुभम गावंडे, विनोद इंगळे, सतीश ठाकरे, अजित हुड, ईश्वर हुड, राहुल कोचे, बंटी काळे, किसना इंगळे, दीपक इंगळे, जितेंद्र वैद्य, तुकेश घरजाळे, दुर्गेश मेश्राम, मयूर वैद्य, राकेश कोचे, चेतन पुंड, रेवनाथ श्रीरामे, सुनील ठाकरे, चौरू दोनाडकर,राहुल ताकोद,स्वप्नील भगत,शिवराज निमजे ईत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तसेच जनमैत्री बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक व रक्तदान शिबिर आयोजक स्वप्नील चौधरी यांनी रक्तदात्यांना खाण्यासाठी केळी, बिस्किट, चाय, फ्रुटी, नास्ता व जेवण ईत्यादीची सुविधा केली, तसेच सर्व रक्तदात्यांना गौरव म्हणून पारोतोषिक देण्यात आले व रक्तदान शिबिर व्यवस्थितरीत्या पार पडले.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space