*गावखेड्यात लोहा भंगार व्यवसाय करणाऱ्याचा मुलगा पारशिवनी तालुक्यात अव्वल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*गावखेड्यात लोहा भंगार व्यवसाय करणाऱ्याचा मुलगा पारशिवनी तालुक्यात अव्वल*
शिकवणी वर्ग न लावता विज्ञान शाखेत 85.50 टक्के
राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : अत्यंत धकाधकीच्या जिवनात आपला उदरनिर्वाह व्हावा , व मुलांचे योग्य शिक्षण व्हावे . याकरीता पारशिवनी येथील असलम शेख यांनी गावखेड्यात जाऊन लोहा भंगारचे काम सुरु केले.या व्यावसायीकाचा मुलगा रेहान शेख याने नुकत्याच बारावीच्या परिक्षेत 85.50 टक्के गुण प्राप्त करुन पारशिवनी तालुक्यात अव्वल स्थान पटकाविले. त्यांचा या यशामुळे तालुक्यात रेहान शेख चा गुणगौरव होत आहे.
रेहान शेख हा पारशिवनी तालुक्यातील बाबुळवाडा येथील लाल बहादुर शास्त्री कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने आपल्या परिस्थीतीची जाणीव ठेवत , इतर मुलांप्रमाणे कुठेही शिकवणी वर्ग लावलेले नव्हते. शिक्षकांनी शिकविलेले आत्मसात करुन व पुस्तकांचे वाचन करुन हे यश प्राप्त केले. रेहानचे वडिल असलम शेख रोज सकाळी उठुन तालुक्यातील गावखेड्यात जाऊन लोहा भंगार विकत घेत होते. कधीकधी तर त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत होते. आपले वडिल इतके काबाड कष्ट करत असल्याची जाणीव रेहानला होती. त्याने आपल्या या जाणीवेला मनात ठेवत भरघोस अभ्यास केला.व नुकत्याच लागलेल्या बारावीचा निकालात तो 85.50 टक्के गुण प्राप्त करत पारशिवनी तालुक्यात अव्वल आला. त्याने आपल्या यशाचे योगदान आई , वडिल व शिक्षक यांना दिले. लक्ष्मीकांत लोणारे , सुधाकर मेश्राम , अशोक हटवार , गौरव ठाकरे , अयाज शेख , अर्शद शेख , एकनाथ पजई यांनीही मला नेहमीच सहकार्य केल्याचे रेहानने सांगीतले. त्याला पुढे कम्प्युटर इंजिनीअर बनायचे आहे. असेही त्याने सांगीतले. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरावरुन गुणगौरव होत आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space