बोरडा येथे वादळी वाऱ्याचे पुन्हा आगमन.
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
बोरडा येथे वादळी वाऱ्याचे पुन्हा आगमन.
शेतकऱ्याच्या गोठ्यावरील उडाले टिनाचे शेड.
अजूनही मिळाली नाही नुकसान भरपाई.
राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : परिसरातील बोरडा सराखा येथे पुन्हा वादळी वाऱ्याचे आगमन होऊन शेतातील घरावरील शेड उडाल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान केले आहे.तर रस्त्यावर झाडे कोसडून पडल्याने काही वेळ दळणवळण बंद होती.
माहितीनुसार, बोरडा येथील रहिवासी पुंजाबाई नामदेव नारनवरे,लक्ष्मण रामचंद्र गजबे व कृष्णा चैतराम सलामे यांच्या शेतातील राहत्या घराचे व जनावरांच्या गोठ्यावरील दि.२३ मे ला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने गोठ्यावरील शेड उडून दूर जाऊन पडले.तर गोठ्यात ठेवलेल्या दुचाकीवर गोठ्यातील बांधकामाच्या विटा पडल्याने दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे.
गावातील समाजसेवक कुंडलिक जांभुळे यांनी सर्कलचे जि.प.सदस्य संजय झाडे यांना घटनेची माहिती दिली व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
अजूनही मिळाली नाही नुकसान भरपाई.
नुकसानग्रस्त शेतकरी आहेत भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत.
याअगोदर देखील गेल्या ३० मार्चला बोरडा सराखा येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील छत उडाले होते.प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा तर केला मात्र १ महिना लोटूनही त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नाही.परत परत ३० एप्रिलला बोन्द्री व हिवरा बेंडे येथील नागरिकांचे वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.तर पुन्हा २३ मे ला बोरडा येथे वादळी वाऱ्याने पुन्हा आर्थिक नुकसान झाले आहे.आता बोरडा,सराखा,बोन्द्री व हिवरा बेंडे येथील नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांची नुकसान भरपाई कधी मिळते याकडे लक्ष लागलेले आहे..
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space