नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *लोकसभा निवडणूकीच्या मत मोजणीसाठी कळमना बाजार समिती सज्ज* – जनता टाइम्स न्यूज

*लोकसभा निवडणूकीच्या मत मोजणीसाठी कळमना बाजार समिती सज्ज*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*लोकसभा निवडणूकीच्या मत मोजणीसाठी कळमना बाजार समिती सज्ज*

जिल्हाअधिकारी यांनी प्रत्यक्षपणे केली पाहणी


राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी

*नागपूर* : नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जुन ला कळमना बाजार समिती नागपूर परिसरात असुन कळमना बाजार समिती मत मोजणीकरीता सज्ज झालैले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे चांगला वंदोबस्त करण्यात आला आहे. कळमना बाजार समिती मधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही त्रास नव्हता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
४ जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. ५०० बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे १० टेबल १० अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत.
ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी नागपूर लोकसभेसाठी १२० टेबल व रामटेकसाठी १२० टेबल या प्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यादृष्टीनेही नियोजन केले आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now