वाघाने केले २५ वर्षीय तरुण युवकाला ठार. देवलापार वनपरिक्षेत्र हद्दीतील घटना.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

वाघाने केले २५ वर्षीय तरुण युवकाला ठार.
देवलापार वनपरिक्षेत्र हद्दीतील घटना.
राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या छवारी गावातील एका २५ वर्षीय तरुण गुराख्याला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दि.८ जून दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार,देवलापार वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या छवारी पो.करवाही येथील २५ वर्षीय रहिवासी विक्की बाळकृष्ण बोपटे हा नेहमीप्रमाणे जनावरे चरायला घेऊन गेला असतांना गावाशेजारील शेतात जनावरे चारत असतांना वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला.यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती सोबत असलेल्या गुराख्यांनी गावात दिली. व गावातील लोकांनी देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील यांना देण्यात आली.त्यांनी तात्काळ वनविभागाची टीम घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा केला.व मृतकाच्या कुटुंबाला शासन नियमाप्रमाणे मदत देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी रामटेक पंचायत समितीचे सभापती यांनी सांगितले की, या परिसरात वाघाची दहशत गेल्या अनेक दिवसांपासून आहे.याबाबत वनविभागाला सुचनादेखील देण्यात आली होती.वाघाने शेतात येऊन एका तरुण गुराख्याला ठार केले ही घटना अतिशय दुःखद आहे.वनविभागाने मृतकाच्या कुटुंबाला शासन नियमांप्रमाणे मदत करावी अशी विनंती आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
