नागपूरच्या नरेंद्रनगरातील व्यक्तीची खिंडसी तलावात आत्महत्या
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
नागपूरच्या नरेंद्रनगरातील व्यक्तीची खिंडसी तलावात आत्महत्या
राजू कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : नरेंद्र नगर, नागपूर येथील प्रदीप साधुराम मरकाम वय 40, यानी खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. 18 जून रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी मृताची मोटारसायकल क्रमांक एमएच ३१/बीयू ८५० आढळून आली. खिंडसी तलावाच्या पानी सोडण्याच्या गेटजवळ तलावात त्याचा मृतदेह दिसल्यानंतर तेथील तरुणाने पोलिसांना माहिती दिली. स्थानिक तरुणाच्या मदतीने पोलिसांनी मृतक ला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात आणले। त्याच्या खिशाची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात मोबाईल सापडला. यासोबतच खिशात ॲक्सिस बँकेचे एटीएम कार्ड सापडले. एटीएम कार्डवर प्रदिप मरकाम असे लिहिले होते. पोलिसांनी त्याचे सिमकार्ड काढून दुसऱ्या फोनवरून फोन केला असता तो नरेंद्र नगर येथील प्रदीप मरकम असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकाने दिली. आत्महत्येची माहिती त्याच्या नातेवाईकांकडूनच मिळू शकते.
मोबाईलवरूनच मृतकाचा पत्ता लागला. ठानेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गजू माहुरे तपास करत आहेत.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space