नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाघाच्या हल्ल्यात पून्हा शेतकऱ्याचा मृत्यु शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद करावे काय? – जनता टाइम्स न्यूज

वाघाच्या हल्ल्यात पून्हा शेतकऱ्याचा मृत्यु शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद करावे काय?

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाघाच्या हल्ल्यात पून्हा शेतकऱ्याचा मृत्यु
शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद करावे काय?

राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी

रामटेक : शेतात घरच्या गाई म्हैशी चारायला गेलेल्या शेतकऱ्यांवर आज वाघाने हल्ला केला त्यात नवेगाव (वडांबा) येथील शेतकरी धनराज मनिराम नैताम वय ५३ असे आहे. त्यामुळे शेतकऱ्याना शेतात जायचे नाही काय असा प्रश्न निर्माण झाला.ही घटना आज दुपारी चारचे दरम्यान नवेगाव बीट क्र २७६ मध्ये घडली.
याबाबत माहीती अशी की, वनपरीक्षेत्रांतर्गत नवेगाव बीट मध्ये नवेगाव (वडांबा) येथील रहिवासी शेतकरी धनराज मनिराम नैताम हे स्वत:च्या घरचे गुरे घेवून गावातगतच अवध्या हाकेच्या अंतरावर २०० ते ३०० मिटरवर शेतालगत गुरे घेवून गेले असता त्यांचेवर हल्ला करून जखमी केले. त्यात त्यांचा घटना स्थळीच मृत्यु झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेतली जखमीला देवलापारच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी ऋषीकेश पाटील व देवलापारचे ठाणेदार राजेश पाटील आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पाेहचून परीस्थीती पाहिली. पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासनी करीता ग्रामिण रुग्णालयात ठेवण्यात आले.

अर्धी तासातच केली म्हैसीची शिकार
या वाघाने धनराज यांच्या हल्ला केल्याने त्यांची जनावरे भयभीत होवून पळाली त्यामुळे त्या वाघाला शिकार करता आली नाही. त्यामुळे त्याने त्याच परीसरातील जूनेवानी रस्त्यावर वडांबा येथील रहिवासी शंकर बावीसताले यांची म्हैस मारली.

वाघांचा बंदोबस्त कसा होणार
या भागात मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढलेली आहे.त्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वाघ हे लगतच्या कोर एरीयातील असून जंगल सफारीने त्रस्त झालेले वाघ या भागात येत असून त्यामुळे ही परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जंगल सफारीच्या नावावर हजारोंची लुट करणाऱ्या वनविभागाने महसुल कमावने बंद करून नागरीकांच्या जिवाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now