*आदिवासीबाहुल देवलापार मंडळातील शेती सिंचनाकरिता व्हावा ग्रॅव्हिटी वर आधारित सिंचन प्रकल्प*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*डॉक्टर राजेश ठाकरे यांची कल्पकता
*आदिवासीबाहुल देवलापार मंडळातील शेती सिंचनाकरिता व्हावा ग्रॅव्हिटी वर आधारित सिंचन प्रकल्प*
…. … . … … . .. ….
*तोतलाडोह डॅम ते जंगलातील नैसर्गिक नदी नाल्याद्वारे सर्व जिल्हा परिषद तलाव मध्ये पाणीसाठा प्रकल्प.*
….. …… …… ….. …. …
*मा.ना देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सह प्रकल्पाचा प्रस्ताव**
राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
*********************
*विविध 8 प्रकारचे फायदे देणारा प्रकल्प .*
1. शेतकऱ्यांना 24 तास सिंचनाकरिता पाणी
2. 24 तास जंगलातून नैसर्गिक नदी नालाद्वारे हळूहळू पाणी वाहत वाहत राहणार त्यामुळे पाणी अभावी जंगली प्राणी मरणार नाहीत.
3. सर्व जिल्हा परिषद चे तलाव तुडुंब भरणार व त्याचा ओव्हर फ्लो सरळ ग्रविटीच्या आधारावर खिंडसी तलावात येणार त्यामुळे रामटेक ,मौदा, तुमसर, मोहाडी या तालुक्यात शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार .खिंडसी डॅमचे पाणी.
4. आदिवासी बहुल क्षेत्रातील सर्व गावातील विहिरीची बोरवेलची वॉटर लेवल वाढणार.
5. आदिवासी शेतकरी बारावी महिने नदी पिकाची फसल घेण्याकरिता सुसज्ज असणार.
6. आदिवासी युवकांना शेती व्यवसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
7. अत्यंत कमी खर्चात तयार होणारा प्रकल्प.
8. प्रत्येक जिल्हा परिषद तलावाचे सिंचन क्षेत्रफळ दहा पटीने सिंचन क्षमता वाढवणारा प्रकल्प.
.*** ************t*********
*महाराष्ट्र राज्य सरकार ने घ्यावा पुढाकार ,: डॉक्टर राजेश ठाकरे यांची मागणी*
******** ***** **** ***
*मध्य प्रदेश सरकार व केंद्र सरकार यांच्याशी समन्वय साधून आदिवासी शेतकऱ्यां च्या शेती सिंचनाच्या हितार्थ तसेच जंगली प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर करण्याकरिता अर्थातच प्राणी व जंगल संरक्षणाकरिता या प्रकल्पाची नितांत गरज आहे*
********** ***** **** ****
प्रति
*मा.ना देवेंद्र फडणवीस साहेब*, उपमुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य ,मुंबई. पाटबंधारे मंत्री, महाराष्ट्र राज्य,मुंबई.
*विषय :रामटेक तालुका अंतर्गत आदिवासी देवलापार मंडळ भागात. प्रस्तावित सिंचन प्रकल्प मंजूर करण्याकरिता राज्य सरकारने पुढाकार घेणे बाबत .*
*ग्रॅव्हिटी वर आधारित प्रस्तावित सिंचन प्रकल्प:*
…. … . … … . .. ….
*तोतलाडोह डॅम ते जंगलातील नैसर्गिक नदी नाल्याद्वारे सर्व जिल्हा परिषद तलावा मध्ये पाणीसाठा प्रकल्प.*
महोदय
आपणास या पत्राद्वारे निवेदन देण्यात येत आहे की नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात देवलपर मंडळ क्षेत्र हा आदिवासीबाहुल क्षेत्र असून सदर आदिवासी शेतकरी हे सिंचना पासून वंचित आहेत .येथे काही ठिकाणी जिल्हा परिषद चे तलाव असून सदर जिल्हा परिषद च्या तलावाला पुरेसे पाण्याचे स्त्रोत नाहीत .तसेच जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून कॅनलची दुरुस्ती करण्याकरता सुद्धा त्यांच्याकडे निधी नाही .तो सुद्धा अभाव निदर्शनात येत आहे सदर देवलपर मंडळ क्षेत्रची भौगोलिक परिस्थिती बघता या ठिकाणी खालील प्रकारे मागणी आहेत.
1. तोतलाढोह डॅम चे पाणी नैसर्गिक नदी नाल्याद्वारे जर ग्रॅव्हिटीच्या आधारावर सोडण्यात आले तर जिल्हा परिषदचे सर्व तलाव त्या ठिकाणी भरतील आणि प्रसंगी तीनही हंगामामध्ये बाराही महिने आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनाकरिता व शेती वर आधारित विविध उद्योगधंदे करता त्यांना पाणी उपलब्ध होईल व या सर्व जिल्हा परिषद तलाव चा ओळखलो सरळ नैसर्गिक नाल्याद्वारे खिंडसी तलाव मध्ये जात असतो फक्त गरज आहे नवीन प्रकल्प भरण्याची .
सदर नवीन देवलापार मंडळ सिंचन प्रकल्पाचे फायदे खालील प्रमाणे असणार आहेत.
1. आदिवासी शेतकऱ्यांना 24 तास 12 महिने मुबलक पाणी उपलब्ध होणार.
2. जंगल संरक्षण तसेच वन्य प्राणी संरक्षण करिता ठरणार फायदेशीर: नैसर्गिक नदी नाऱ्याद्वारे जंगलातून पाणी वाहत असल्याने तसेच जागोजागी चेक डॅम तयार केल्यास जंगली जनावर सुद्धा उन्हाळ्यात पाण्याच्या अभावी मरणार नाही. तसेच वॉटर लेवल सुद्धा मेंटेन राहणार असल्याने जंगलातील जागोजागच्या बोरवेलला पुरेसं पाणी असणार आहे त्यामुळे जंगल संरक्षण तसेच प्राणी संरक्षणाकरिता सुद्धा या प्रकल्पाची मदत होणार आहे.
3. सदर सर्व जिल्हा परिषद तलावाचा ओव्हर फ्लो नैसर्गिक नदी नाल्यांद्वारे डॅम मध्ये जमा होतो त्यामुळे खिंडसी डॅमच्या माध्यमातून सुद्धा पुढील तुमसर मोहाडी या भंडारा जिल्ह्याच्या काही तालुक्यात सुद्धा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचण्याकरिता खिडकी आमची मदत होणार आहे.
4. नैसर्गिक नाल्यांचे वाहते पाणी असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईलच त्यांच्या जनावरांना सुद्धा पुरेसं पाणी जागोजागी प्यायला उपलब्ध होणार तसेच परिसरातील गावातील विहिरींची बोरवेलची वॉटर लेवल सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची मदत होणार आहे.
तेव्हा या बहु फायदेशीर मल्टी टास्किंग प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिल्यास निश्चितच आदिवासी बाहुबल क्षेत्रासह इतरही क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभ होणार आहे .
तेव्हा आपण यावर आवश्यक यंत्रणा उभारून सर्वेक्षण करण्यात यावे व सदर प्रकल्प लवकरात लवकर अस्तित्वात आणण्याकरिता राज्य सरकार मध्य प्रदेश सरकार व केंद्र सरकारची मदत घेण्याकरिता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा ही विनंती.
दिनांक आपला
- स्थळ डॉ राजेश ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा ग्रामीण कार्यालय रामटेक
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space