*शहरातील शेतकरांने गावातील शेतकर्याचे पाण्याचे स्त्रोत बुजविले*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*शहरातील शेतकरांने गावातील शेतकर्याचे पाण्याचे स्त्रोत बुजविले*
राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
*रामटेक* :- देवलापार या आदिवासी क्षेत्रातील झिंजेरीया या गावात प्रितीश भोयर या व्यक्तीने सर्व्हे नंबर २४ ची शेती विकत घेतली , शेतीची मोजणी केली ज्या मध्य शेतीला लागुन असलेला बंदारा व नाला त्याच्या हदी मध्य येत आहे म्हणून शासनाने शेतकर्यानसाठी बांथुन दिलेला बंदारा तोडला व जलयुक्त शिवार अंतर्गत २०१६ मध्य खोलिकरण करण्यात आलेला नाला बुजविण्यात आला, या शेतकर्याने कृषी विभाग, ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयाला कोणत्याच प्रकारची माहिती दिली नाही, बंदारा तोडल्यामुळे व नाला बुजविल्यामुळे आजुबाजुच्या शेतकर्याना पाण्यापासुन वंचित केले आहे, झिंजेरीया गावातील शेतकर्यानी तालुका कृषी विभाग रामटेक व अप्पर तहसील कार्यालय देवलापारला तक्रार दिली असुन बंदारा व नाला पुर्ववत करुन देण्यात यावे अशी मागणी केली आहे. दि.३ जुलै ला कृषि विभागाचे मंडळ अधिकारी व झिंजेरीयाचे पटवारी यांनी घटनास्थळी येउन संयुक्त मौका चौकशी केली व शेतकर्यान समक्ष पंचनामा केला
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space