नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना लेखन व साहित्य वाटप* – जनता टाइम्स न्यूज

*गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना लेखन व साहित्य वाटप*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना लेखन व साहित्य वाटप*

– *अध्यक्ष धनराज बडोले यांचा “एक हात मदतीचा” हा उत्स्फूर्त उपक्रम*

नागपूर : बेसा येथील राजगृह फाउंडेशन ग्रुप बेसाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य वाटप अभियानांतर्गत अनेक वर्षापासून “एक हात मदतीचा” हा उपक्रम सुरू असून ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने भारताच्या भविष्य आहे. आणि आज अनेक ग्रामीण भागात अर्थकारणामुळे अनेकांना आपले शिक्षण अर्ध्यावर थांबावाव लागत आहे. अशाच काही मुद्द्यावर लक्ष देत राजगृह फाउंडेशन ग्रुप बेसा तर्फे अध्यक्ष धनराज बडोले यांनी “एक हात मदतीचा” या उपक्रमाला सुरुवात केली.

राजगृह फाउंडेशनचे ग्रुप बेसाचे अध्यक्ष धनराज बडोले सुद्धा अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन समोर आले आहेत. याची त्यांना जाणू आहे म्हणून आपल्या हातून काहीशी मदत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना व्हावी अशी त्यांची नेहमी इच्छा असते आणि गरीब होतकरू दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीला ते नेहमी धावत असतात.

आतापर्यंत त्यांनी असंख्य शैक्षणिक साहित्य वाटपाच्या स्वरूपात लॅपटॉप, स्टडी टेबल, स्टडी चेयर, शालेय बॅग, पाटी, कंपास पेटी, चित्रकला वही, रंगीत खडू इत्यादी वस्तू मागील वर्षापर्यंत वाटप केले.

यावर्षी नोटबुक, वह्या, पेन पेन्सिल आदी वस्तूचे वितरण त्यांनी केले आहे. यात वर्ग एक ते दहावीचे विद्यार्थी, बीपीएल धारक विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी यांचा समावेश त्यांनी विशेष केला आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद बेसाचे – 12 विद्यार्थी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळाचे – 14 विद्यार्थी, कबीरा कॉन्व्हेंट – 27 विद्यार्थी व इतर शाळेतून 100 विद्यार्थी असे एकूण 153 विद्यार्थ्यांनी चार दिवसात याचा लाभ घेतला आहे, हा उपक्रम 7 जुलै पर्यंत सुरु आहे. करिता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now