ग्राम पंचायत सासरा येथिल बेघर, विधवा, निराधार घरकुलापासून वंचित लाभार्थी महिला बसली आमरण उपोषणास, ग्रामपंचायत ने केला विधवा महिलेवर अन्याय

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

ग्राम पंचायत सासरा येथिल बेघर, विधवा, निराधार घरकुलापासून वंचित लाभार्थी महिला बसली आमरण उपोषणास, ग्रामपंचायत ने केला विधवा महिलेवर अन्याय
पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण
आशिष सिंगजुडे
तालुका प्रतिनिधी साकोली
साकोली :- साकोली पंचायत समिती अंतर्गत सासरा ग्रामपंचायत येथील रमाई आवास योजनेतील पात्र घरकुल लाभार्थी संजिता आसाराम बोरकर यांनी दि. ५/७/ २०२४ ला ग्रामपंचायत सासरा येथे घरकुलच्या मागणीला घेऊन निवेदन ग्रामपंचायत सासरा यांना सादर केला होता,
ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत येथील पदाधिकारी यांनी या निराधार बेघर, विधवा, पात्र लाभार्थी माहिलेकडे घरकुल मंजुरीसाठी कानाडोळा करत तिला घरकुलास पात्र असुन पात्र न करता उपोषणास बसण्यास बाध्य केले.
सदर महिला लाभार्थी बेघर, निराधार, विधवा अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील आहे. रमाई आवास योजनेतून मला घरकुल मिळावे या मागनीला घेऊन ग्रामपंचायत कार्यालय सासरा ता. साकोली समोर दिनांक. ११/७/२०२४ ला दुपारी १:०० वाजे पासुन आमरण उपोषणाला सुरवात केली. पोलीस विभागाचे दोन पुरुष कर्मचारी सायंकाळी 4:45 दरम्यान येऊन महिलेला कश्यासाठी उपोषणास बसले तुमचे नाव काय एवढे विचारून निघून गेले, अशी माहिती महिलेने दिली.
ग्राम पंचायत सासरा समोर आंदोलन 11 जुलै पासून ते 12 तारखे ला वृत्त लिहे पर्यंत सुरु होते, परंतु आंदोलन स्थळी कोणतेही पोलीस विभागाचे अधिकारी/कर्मचारी, महिला पोलीस यांना बंदोबस्तसाठी, संरक्षणासाठी, ठाणेदार साकोली यांनी पाठवले नसल्याचे समजून येत आहे.
या प्रकाराने पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. एक महिला उपोषणास बसली असताना रात्रीच्या वेळेला एकही कर्मचारी न संरक्षणास न हजर राहणे हे म्हणजे पोलीस खाता महिलासाठी किती तत्परतेने संरक्षण देते हे दिसत आहे.
जेव्हा पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत लाभार्थी बेघर महिला आमरण उपोषणास बसली राहील असे त्यांनी सांगितले त्यावेळी महिलेला समर्थन म्हणून गावकरी किशोर बारस्कर, भास्कर इटवले, राजेश पोवनकर, अर्जुन खडके, अनिता बारस्कर, भास्कर गोटेफोडे, यांनी बेघर, विधवा, निराधार महिलेला घरकुल मिळावे म्हणून ग्रामपंचायत सासराच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनास समर्थन दिले. मागणीची पूर्तता न झाल्यास पंचायत समिती साकोली येथे तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करू असेही माध्यमाला आंदोलनकर्ता महिलेने कळविले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
