अखेर पिटेझरी चे ते अतिक्रमण वन विभागाने काढले गट ग्रामपंचायत वलमाझरी ता. साकोली येथिल घटना

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

अखेर पिटेझरी चे ते अतिक्रमण वन विभागाने काढले गट ग्रामपंचायत वलमाझरी ता. साकोली येथिल घटना
आशिष सिंगनजुडे
तालुका प्रतिनिधी साकोली
साकोली :- वलमाझरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिटेझरी गावाच्या हद्दीमध्ये येत असलेल्या वन विभागाच्या जमीन मध्ये शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करण्यात आले होते. सदर चे अतिक्रमण माधव सोमा वलके रा. पिटेझरी ता. साकोली जिल्हा भंडारा यांनी केले होते. त्यांना वेळोवेळी वन विभागाकडून नोटीस देऊन सुध्दा ते वन विभागाच्या कार्यालयात उपस्थीत झाले नाही व स्वतःच्या मालकीची जागा असल्याचे पुरावे अतिक्रमण धारकांकडून देण्यात आले नाही.
दिनांक 17/07/2024 रोजी अतिक्रम काढन्यासाठी वनविभागाने दोन JCB व ट्रॅक्टर आणले अतिक्रमण काढत्यावेळी माधव सोमा वलके यांच्या पत्नी तसेच मुली जेसीबी समोर येऊन अडवण्याचा प्रयत्न केला व अतिक्रण काढण्याचा विरोध केला. वनविभागाच्या अधिकारी यांच्या कर्मचाऱ्या सोबत शाब्दिक माधव सोमा वलके व त्यांचा परिवाराचा मौक्यावर वाद सुरू असताना त्यांना फॉरेस्ट च्या महिला कर्मचाऱ्यांनी पकडुन दूर नेले व अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
सदर कार्यवाहीत सहाय्यक वनरक्षक एस. टी. मेंढे लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. गोखले लाखनी व वनविभाग व ग्रामपंचायत वलमाझरी येथील सरपंच पुरुषोत्तमजी रुक्मोडे, उपसरपंच सत्यपालजी मरस्कोले, पोलीस विभाग यांच्या संयुक्त कारवाईने अतिक्रमण काढण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
