नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , प्रहारच्या दणक्याने संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेचे पैसे 12 तासाच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा, घरकुलाचे 40 कोटीही राज्य विभागाला वितरित. – जनता टाइम्स न्यूज

प्रहारच्या दणक्याने संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेचे पैसे 12 तासाच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा, घरकुलाचे 40 कोटीही राज्य विभागाला वितरित.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

प्रहारच्या दणक्याने संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेचे पैसे 12 तासाच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा, घरकुलाचे 40 कोटीही राज्य विभागाला वितरित.

👉🏻 प्रहारच्या दणक्याने प्रशासन व शासनाचा मोडला मनका

महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
गोंदिया :- तिरोडा तहसील मध्ये संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेचे पैसे स्टेट बँके द्वारे तसेच तहसील कार्यालयाच्या लेट लतीफ कारभाराने राखी, कान्होबा, पोळा, मारबत यासारख्या सणासुदीचा पर्वात लाभार्थ्यांना मिळाले नाही. त्यांचे सन हे अंधारातच गेले लाभार्थी बँकेच्या तर कधी तहसील कार्यालयाच्या चकरा मारत होते.
कोणत्याही जन प्रतिनिधीना सामान्यांसाठी तळमळ नाही सर्व सामान्यांच्या व्यथा ऐकून त्यांच्या न्याय हक्कासाठी निःस्वार्थ पणे लढा देणारा एकमेव पक्ष म्हणून ओळख असलेल्या प्रहार पक्षाकडे लाभार्थ्यांनी धाव घेतली व पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्याकडे आपली व्यथा मांडून पैसे मिळवून देण्यासाठी विनंती केली.
त्याच बरोबर शासनाने प्रधानमंत्री, मोदी शबरी, रमाई घरकुल आवास योजनेचे च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 5 ते 6 महिन्यापासून देण्यात येणारा पैसा दिलेला न्हवता घरकुल मंजूर झाले की, लाभार्थी आपले मातीचे मोडके-तोडके, पालिचे कुळाचे घर तोडून त्या जागेवर घरकुलाचे बांधकाम करतात.
तात्पुरते वास्तव्य तंबू ताणून किंवा एक दोन महिन्यासाठी गावातील कोणाच्याही घरी किंवा शेळ्या, मेंढ्याच्या गोठ्यात आसरा घेवुन आपल्या लहान-मोठ्या मुला बाळांसह वास्त्याव्य करतात. रेती, सिमेंट, लोहा, मजुरी चे दर गगनाला भिडले असतांना शासन देत असलेल्या एक लाख तीस हजार रुपयाच्या निधीतून घर बांधणे शक्य नाही. लाभार्थी उसने- उधारी, सामान, पैसे घेत कर्जबाजारी होऊन घराचे बांधकाम करतो घरकुलाचे पैसे मिळताच उधारी सामान, कर्जवाले यांना परत करतो. तर कोन्या लाभार्थी बांधवाला कुठूनही पैसे न मिळाल्यास आपल्या पोटाला चिमटा लावून घर बांधण्याला सुरुवात करतो. ही गंभीर बाब लाभार्थ्यांनी प्रहारचे गोंदिया जिल्हाध्यक्ष भांडारकर यांच्या कडे आपल्याव्यथा मांडत दाद मागून देण्यासाठी साकडे टाकले.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना घरकुल निधीसाठी तर भारतीय स्टेट बँक तिरोडा शाखा प्रबंधक, तहसीलदार तिरोडा यांना संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेचे पैसे तातळीने वितरित करण्यासाठी निवेदन सादर केले होते. त्याची अमल बजावणी न झाल्याने प्रहार पक्षाकडून तहसील कार्यालय पंचायत समिती तिरोडा येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याकरिता जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधिक्षक गोंदिया, ठाणेदार तिरोडा, गट विकास अधिकारी तिरोडा, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.
प्रहारच्या दणक्याने संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 12 तासाच्या आता पैसे जमा झाले.
तर शासनाने संबंधित राज्यस्तरीय घरकुल विभागाला 40, 00,00,000/- रुपयाचा निधी वितरित केला असुन लवकरच घरकुल लाभार्थ्यांना खात्यात वितरित करण्यात येईल असे तिरोडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सतीश लिल्हारे यांनी प्रहार पक्षाला आंदोलन स्थळी व माध्यमाला कळविले आहे.


प्रहारच्या आक्रोश आंदोलनाने यशाची पायरी गाठल्याने सर्व लाभार्थ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर तसेच बच्चूभाऊ कडू यांचे आभार मानले सर्वत्र सर्वसामान्यांसाठी, शेतकरी, मजूर, कामगार दिव्यांगासाठी लढणारा पक्ष म्हणून ओळख आहे. येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रहारचा बाजूने प्रत्येक नागरिक उभा राहील त्यासाठी आम्ही स्वखर्चाने मत मागण्यासाठी घरोघरी जाऊन मत मांगू असे लोकमुखात चर्चासत्र रंगत असल्याचे वारे वाहत आहेत प्रहारने विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणीही सर्वसामान्य नागरिकांनी जिल्हाध्यक्ष भांडारकर यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात प्रथमताच स्वतः सर्व सामान्य जनतेच्या मुखातून प्रहारच्या उमेदवाराची मागणी होत असल्याने इतर पक्षांना चांगलीच कसरत विधानसभा निवडणूक मध्ये करावी लागणार आहे. अनेकांचे गणित तर कित्तेकाचे दाव पणाला लागणार असे चित्र दिसून येत आहेत.
प्रहारच्या आक्रोश आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, पंचायत समिती सदस्य सौ. वनिताताई भांडारकर, उरकूड उके, मुरमाडी उपसरपंच राजु मेहर, सौ. मंदाताई टेंभरे सरपंच मुरमाडी, गोपाळ शेंडे, पत्रकार अमरदीप बडगे, रतन खुळसिंगे, मनोहर शेंडे, आशिष गौतम (शाखा प्रमुख), राजु बरीयेकर ( दिव्यांग संघटना ), सार्वेताई, गुड्डू सोनेवाने, निराधार योजेनेचे तसेच घरकुल योजनेचे लाभार्थी. मोठ्या संख्येने उपस्थित होते. गट विकास अधिकारी, पंचायत समिती तिरोडा, तहसीलदार तिरोडा यांनी त्याबाबतीत पत्र प्रहार ला दिल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली.

 

✍️जनता टाइम्स✍️

🎤जटा TV🎤

इंसाफ चाहता है इंडिया …..

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed