भंडारा येथे जुनी पेन्शन सभा संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

भंडारा येथे जुनी पेन्शन सभा संपन्न
आशिष सिंगनजुडे
तालुका प्रतिनिधी साकोली
भंडारा :- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सभा संत शिवराम महाराज विद्यालय भंडारा येथे संपन्न झाली. जुनी पेन्शन व सर्वोच्च न्यालयाची भूमिका यावर विचार विमर्ष करण्यासाठी एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीने सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कृतिसमितीचे जिल्हाध्यक्ष उमेश सिंगनजुडे, मुख्य मार्गदर्शक म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देणारे याचिकाकर्ते प्रदीप महल्ले, दीपक बोकडे, सचिन पिसे विठ्ठल धोटे, मुख्याध्यापिका अर्चना भोयर, सैनपाल वासनिक विचारपीठावर उपस्थित होते.
या सभेत श्री प्रदीप महल्ले म्हणाले की सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कम असून सर्वोच्च न्यायालय आपल्याला न्याय देणार. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंगनजुडे म्हणाले 1. नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन न्यायालयाच्या माध्यमातून मिळू शकते श्री. महल्ले न्यायालयीन लढाई लढत आहेत आपण त्यांच्या पाठीमागे तन-मन, धनाने उभे रहावे लागेल असे मत मांडले. या सहविचार सभेला 1 नोव्हेबर पुर्वी नियुक्त पण पेन्शन लागू नसलेले शिक्षक -शिक्षकेत्तर बंधू -भगिनी उपस्थित होतें.
कार्यक्रमाचे संचालन धीरज बांते, प्रास्तविक नंदकुमार क्षिरसागर, आभार खेमराज परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामभाऊ राघोर्ते, नीलकंठ कापगते, योगराज मेश्राम, देवराम फटे, उमेश रेहपाडे, गंगाधर भदाडे, हिवराज कमाने,राजू निंबार्ते, जागेश बांते यांनी विशेष सहकार्य केले.
✍️जनता टाइम्स✍️
🎤जटा TV🎤
इंसाफ चाहता है इंडिया …..

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
