*पाणी अडवा ,झाडे लावा ,झाडे जगवा:- मा. आरती उके यांचे आव्हान*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*पाणी अडवा ,झाडे लावा ,झाडे जगवा:- मा. आरती उके यांचे आव्हान*
——————–
*करानडला येथे वन्यजीव सुरक्षा सप्ताहाचा समारोपीय बक्षीस वितरण थाटात संपन्न*
प्रतिनिधी : अर्चना लोखंडे (विदर्भ ब्युरो चीफ )
“पाणी अडवा ,पाणी जिरवा ,झाडे लावा- झाडे जगवा. वन्यजीव हे समस्त प्राणीमात्रांचे आद्य दैवत आहे .या मूलमंत्र्यांचे जर पालन केले तर वसुंधरा अजून बहरेल फुलेल एवढेच नव्हे तर जो- जो मागील तो- तो मिळेल” असा महत्वपूर्ण प्रतिपादन उमरेड- पवनी- कराडला गेट वन्यजीव पर्यटन सभागृहात दिनांक 7 ऑक्टोबरला वन्य सुरक्षा सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या समारोपीय बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरून वन्यजीव वनपरिक्षेत्राधिकारी सौ.आरती ऊके मॅडम बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जनवन विकास समिती तथा ग्राम परिस्थितीकीय विकास समिती सोमनाळाचे पदाधिकारी डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी लायन्स क्लब नागपूर युनिटी चे सागर कासमोरवार जनता टाइम्स फाउंडेशनचे सचिव मा. प्रदीप लोखंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते .
तसेच प्रमुख अतिथी मिश्रा सर यांनी प्रत्येक नागरिक विद्यार्थ्यांना मिळेल त्या मोकळ्या जागी रस्त्याच्या दुतर्फ झाडे लावून त्यांची जतन करण्याच्या संदेश आपल्या मार्गदर्शनातून केला तर मंचावरील उपस्थित सागर सर यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी मानव आणि वन्यजीव यांच्यातील समन्वय कायम राखण्यावर आपला मनोगत विचार व्यक्त केला.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जनता टाइम्स फाउंडेशनचे सचिव प्रदीप लोखंडे सर यांनी पर्यावरणातील अन्नसाखळी अबाधित राहण्यासाठी, वन्यजीव ऋणानुबंध अधिक घट्ट होण्यासाठी वन्यजीव निर्मिती बरोबरच त्यांचे कायम संगोपन, संवर्धन – संरक्षणावर भर देऊन” जगा आणि जगू द्या” हा मूलमंत्र उपस्थित विद्यार्थी तथा पालक, प्रतिष्ठित नागरिकांना दिला
याप्रसंगी वन्यजीव सुरक्षा सप्ताह दिनांक १ ते ७ ते सात ऑक्टोबर दरम्यान दि. 3 ऑक्टोबर ला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेश्वरी आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुलर येथील निबंध तथा चित्रकला स्पर्धा परीक्षेत विजेते स्पर्धक विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्रक तथा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
यात प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेश्वरी येथे संपन्न झालेल्या निबंध तथा चित्रकला स्पर्धा परीक्षेतील एकूण 84 विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी पुरस्कारास पात्र ठरले. येथील विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी वर्ग 10 चे विद्यार्थीनी कु.समीक्षा गणेश डांगरे ,द्वितीय क्रमांकाचे मानकरी वर्ग 11 चे विद्यार्थिनी कु. काजल चित्तरंजन लांजेवार, तथा कु. ऋतिका मारुती भोयर वर्ग दहावा हिने तृतीय क्रमांकावर यश तसेच चित्रकला स्पर्धेतील पहिल्या स्थानाचे यशवंत विद्यार्थी मोहित मारुती तिवाडे वर्ग 10 वा ,दुसऱ्या स्थानावर कु. श्रेया सुनील माटे वर्ग८ वां तर तिसऱ्या स्थानावर यशवंत ठरलेले श्रेयस फुलचंद ठाकूर वर्ग पाचवा या सर्व विजेत्या स्पर्धकांचे त्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट लेखन तथा चित्र कला कौशल्य सादरीकरणाला वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी पेच व्याघ्र प्रकल्प प्रांत नागपूर च्या सौजन्याने मंचावरील मान्यवरांच्या हस्ते क्रमशः स्मार्ट वॉच, स्कूल बॅग, तथा तिसऱ्या क्रमांकासाठी कॉपर वॉटर बॉटल व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुलर येथील कार्यरत गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनातील स्पर्धक विजेत्या प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धेतील प्रथम स्थानावर कु. खुशबू प्रवीण शहारे, द्वितीय स्थानावर कु.आकांक्षा गुरुदास कोल्हे , तृतीय स्थानावर सोहम हिरालाल ठोंबरे तर चित्रकला स्पर्धेतील निवड पात्र विद्यार्थ्यांमध्ये नैतिक विकास केवट, द्वितीय स्थानावर कु. खुशबू प्रवीण शहारे तर तृतीय स्थानाचे मानकरी चैतन्य रामभाऊ लांजेवार या गुणवंत विद्यार्थ्यांना क्रमशः स्मार्टवॉच, स्कूल बॅग तथा कापर वाटर बॉटल प्रशस्ती प्रमाण पत्रासह मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
समारोपीय बक्षीस वितरणाचा औचित्य साधून विशेष बाब म्हणून स्केटिंग या खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावणारा भारतीय चिमुकला केवळ सहा वर्ष वयाचा असून त्याचे नाव हेमंत प्रमोद जळीत असे असून या भारतीय मुलाच्या अलौकिक यशाबद्दल वन्यजीव वनपरिक्षेत्राधिकारी मा.सौ आरती उके यांनी कलागुणांचा गौरव करीत त्याचा सत्कार पुरस्कार प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
विशेष म्हणजे या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत जगातील एकूण 14 देशांनी सहभाग घेतला होता. या ऐतिहासिक यशाबद्दल वन्यजीव विभागातील समस्त अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.
वन्यजीव सुरक्षा ची विशेष बाब म्हणून बेला येथील सर्पमित्र अनुष धावडे यांनी निसर्गातील सर्व प्रकारचे विषारी तथा बिनविषारी सापाच्या जीवन क्रमाचे दर्शन घडवत जिवंत प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्याविषयी असलेला भय काढण्यास सविस्तर माहिती रूपाने जाणीव जागृती करून उपस्थितत्यांचे मन जिंकले व त्यांच्याकडे असलेले वेगवेगळ्या विविध विषारी सापांना करांदला अभयारण्यात स्वतंत्र करून जीवनदान दिले.
या त्यांच्या धाडस साहस पूर्ण प्रेमळ व करुणावादी निसर्गप्रेमी वृत्ती बद्दल वनपरिक्षेत्राधिकारी सौ. आरती उके मॅडम यांनी या सर्पमित्राचे सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन वन्यजीव वनपरिक्षेत्राधिकारी सौ आरती उके तर सूत्रसंचालन वन्यजीव पर्यटन प्रमुख संजय खंदोडे सर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी क्षेत्र सहाय्यक एल.एन .बनसोड ,नंदेश्वर सर ,वनरक्षक संजय राठोड, आर्. एन .मोहरले ,एन एन घोडके ,एस. एम. भालेराव, वैद्य, वनमजूर रफिक भारत शेंडे सर पठाण आदी वन अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले. यावेळी जनता टाइम्स चे विदर्भ चीफ ब्युरो सौ. अर्चना लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
अंतिमता कार्यक्रमाचा उत्तरार्ध हा स्नेहस्वरूची भोजनाने सांगता करण्यात आली.
निबंध तथा चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रियंवदा माध्यमिक विद्यालय सालेश्वरी येथील प्राचार्य राजू शिवणकर सर, प्रदीप लोखंडे सर, विलास तांबे सर ,भारत शेंडे सर ,ठाकूर सर, रडके मॅडम, राजू सागरे सर ,तनु भोयर, सहारे सर, राकेश उमरेकर सर आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वरील सर्व विजेता स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-बाबांना दिले.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space