नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *प्रेस पत्रकार संघाचा वन्यजीव निसर्ग भ्रमण अभ्यास दौऱ्याचे आयोजन*  – जनता टाइम्स न्यूज

*प्रेस पत्रकार संघाचा वन्यजीव निसर्ग भ्रमण अभ्यास दौऱ्याचे आयोजन* 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*प्रेस पत्रकार संघाचा वन्यजीव निसर्ग भ्रमण अभ्यास दौऱ्याचे आयोजन*

———————–

*वन्यजीव सुरक्षा वनपरिक्षेत्र उमरेड विभागाचा पुढाकार*

—————————-

*पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा वन्यजीव विभागाचा स्तुत्य उपक्रम*

——————

उमरेड:- उमरेड -पवनी -कराडला अभयारण्य विभाग उमरेड तथा वन्यजीव वनपरिक्षेत्र पेच व्याघ्र प्रकल्प च्या सौजन्याने कराडला गेट वन्यजीव पर्यटन कार्यालय कराडला येथे आज दिनांक 6 ऑक्टोबर रोज रविवारला सकाळी नऊ वाजे भिवापूर तथा उमरेड पत्रकार संघाच्या शुभहस्ते वृक्षारोपण तथा अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्षेत्र सहाय्यक मा. एल. एन. बनसोड तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय नंदेश्वर सर, पर्यटक प्रमुख मा. एस. बी. खांदोडे सर ,भिवापूर प्रेस पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. प्रदीप राऊत सर, पुण्यनगरीचे तालुका पत्रकार नरेंद्र ढोमणे सर,राजेश जांबुडे, जोगेंद्र सरदारे, विनोद मेश्राम, अमऱ मोकाशी, सकाळचे पत्रकार सतीश तु डस्कर ,जनता टाइम्स चे विदर्भ चीफ ब्युरो सौ, अर्चना लोखंडे, भिवापूर -उमरेड तालुका प्रतिनिधी कु. काजल तांबे तसेच मुख्य पत्रकार ऑल इंडिया जनता टाइम्स चे प्रदीप लोखंडे आदी मान्यवर पत्रकार गण उपस्थित होते.

याप्रसंगी वन्यजीव वन विभाग उमरेड च्या वतीने पत्रकार मान्यवरांचे रोप देऊन वृक्षारोपणाच्या संदेशातून स्वागत करण्यात आले.

वन्यजीव सुरक्षा सप्ताह दि.1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या सात दिवसाच्या काळात वन्यजीव सुरक्षा विभागांतर्गत विविध स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलेले असून आज येथे पत्रकार मंडळींच्या हस्ते विविध वृक्षांचे लागवड करून जनतेला वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला हे मात्र विशेष.

यात प्रामुख्याने उमरेड पत्रकार संघाचे विनोद मेश्राम, सकाळचे सतीश तुडस्कर अमर मोकाशी भिवापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप राऊत, विदर्भ चीफ ब्युरो जनता टाईम चे सौ .अर्चना लोखंडे , कु. काजल तांबे भिवापूर उमरेड तालुका जनता टाइम्स आधी पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी उमरेड तथा भिवापूर तालुक्यातील समस्त पत्रकार संघातील पत्रकारांचे जंगल सफारी निसर्ग भ्रमंती करून वन्यजीवांचे अभ्यास करण्यात आले आणि वन्यजीव सुरक्षा संदर्भात आणखी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील तथा वन्यजीवापासून होणारे शेतकऱ्यांचे व शेत पिकांची नुकसान कशी टाळता येईल यावर सांगोपांग चर्चा वन्यजीव विभाग तथा पत्रकार यादरम्यान मध्ये घडविण्यात आले.

अभ्यास दौऱ्यात अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन झाले यात प्रामुख्याने हरणींच्या कळप ,रानगवा, माकड व असंख्य प्रजातीच्या वनस्पती व त्यातील त्यांचे अधिवास ,जीवन चक्र यासंबंधी निरीक्षण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक वन्यजीव पर्यटन प्रमुख मा. एस बी खांदोडे सर आभार प्रदर्शन क्षेत्र सहाय्यक मा. नंदेश्वर सर यांनी केले.

याप्रसंगी वन्यजीव वन विभागातील कर्मचारी वनरक्षक मा. संजय राठोड, आर. एल. मोहरले, एन एन. घोडके, एस. एम. भालेराव, वैद्य ,वाहन चालक आदी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now