वन्यजीव सुरक्षा ही काळाची गरज–‘मा. आरती उके मॅडम यांचे प्रतिपादन ( R. F. O)*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*’वन्यजीव सुरक्षा ही काळाची गरज——— ‘मा. आरती उके मॅडम यांचे प्रतिपादन ( R. F. O)
*प्रियंवदा येथे वन्यजीव सुरक्षा अंतर्गतवन्यजीव सुरक्षा ही काळाची गरज——— ‘मा. आरती उके मॅडम यांचे प्रतिपादन ( R. F. O)*
*प्रियंवदा येथे वन्यजीव सुरक्षा अंतर्गतप्रभातफेरीने जनजागृती*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*सालेशहरी:-* वन्यजिव सुरक्षा ही काळाची केवळ गरजच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिक ,तरुण तथा समस्त विद्यार्थ्यांचे आदर्श कर्तव्य असून ते प्रामाणिकपणे केल्यास दुर्मिळ तथा नामशेष होऊ पाहणाऱ्या वन्यजीवांसाठी वरदानात्मक संजीवनी ठरेल असे मार्मिक प्रतिपादन उमरेड वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी ( R. F. O) माननीय सौ. आरती उके मॅडम यांनी अध्यक्षीय स्थानावरून भिवापूर तालुक्यातील कार्यरत असलेल्या प्रियंवदा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी येथे दिनांक १ ऑक्टोबर रोज मंगळवार ला वन्यजीव सुरक्षा सप्ताह अंतर्गत उमरेड पवनी अभयारण्य प्रांत नागपुर वन्यजीव विभागाच्या सौजन्याने आयोजित वन्यजीवसुरक्षा जनजागृती कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विद्यार्थी शिक्षकांना संबोधुन केले .
यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने विद्यालयाचे प्राचार्य राजू शिवणकर सर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रसहाय्यक (नवे.देश) श्री .एल .एन .बनसोड वनपाल, श्री एस. बी. खादोडे, तर अतिथी म्हणून वनरक्षक श्री डी.वी.सूर्यवंशी, वनरक्षक श्री आर. एल . मोहूरले ,वनरक्षक श्री एन .एन.घोडके ,वनरक्षक एन. एम .निनावे, वनरक्षक एस.एम.भालेराव मॅडम आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील श्री विनोद ननावरे सर ,भारत शेंडे सर ,रडके मॅडम ,श्री फुलचंद ठाकूर सर ,भुजाडे मॅडम ,देवराव भोयर ,वामन वानखेडे,
वनमजूर रफिक पठाण तथा हंगामी मजूर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी समस्त मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छाने स्वागत करून प्रास्ताविकतेत समस्त वन अधिकाऱ्यांचे परिचय करण्यात आले
अध्यक्ष स्थानावरून पुढे बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी उमरेड म्हणाले की वन्य जीवांमध्ये वनराजाची वाघ संख्या वाढवण्याच्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकांनी त्यांच्या निवारा अबाधित रावा यासाठी वृक्ष संगोपन ,संवर्धन, वृक्षारोपण व त्यांची सुरक्षा करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे आल्यास ही वन्यजीव संपदा जगातील एकमेव सर्वश्रेष्ठ वन्यजीव संपदा होणार यात तिळमात्र शंका नसल्याचे सांगून समस्त विद्यार्थ्यांनी वन जीवासोबत मैत्री करून त्यांचे संवर्धन करण्याचे आव्हान केले आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन सत्र संपल्यावर गावात विद्यार्थ्यांचे प्रभात फेरीद्वारे वन्यजीव सुरक्षा जनजागृतीस्तव वनपरिक्षेत्र अधिकारी सौ आरती उके मॅडम तथा विद्यालया चे प्राचार्य राजू शिवणकर सर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना हिरवी झेंडे दाखवून शुभारंभ करण्यात आले.
प्रभात फेरी दरम्यान इयत्ता पाचवी ते बाराच्या समस्त विद्यार्थ्यांनी गगनभेदी नारे हातात फलक घेऊन जनजागृती केले. यावेळी फेरीत समस्त शिक्षक वनाधिकारी वनपाल वनरक्षक अगत्याने सामील होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता वन्यजीव सुरक्षा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवून करण्यात आले. यात विशेषता मासे तथा वाघाच्या जीवन चक्रावर आधारित मौल्यवान माहितीचे प्रसारण करण्यात आले
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप लोखंडे सर प्रास्ताविक क्षेत्र सहाय्यक श्री बनसोड साहेब तर आभार प्रदर्शन श्री विलास तांबे सर यांनी केले.
यावेळी देवराव भोयर, वामन वानखेडे ,रोशन बोरकर विद्यालयातील वर्ग प्रतिनिधी आदित्य फुललेले ,कुमारी समीक्षा डांगरे तथा कुमारी आचल गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space