महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

महेश शिवणकर / विदर्भ ब्युरो चीफ
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रशासन विभागाचे उप आयुक्त् श्री शरद पवार यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, भांडार विभागाच्या उप आयुक्त् श्रीम. मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्क्र, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, वैदयकीय अधिकारी डॉ. प्रविण कटके, सहाय्यक आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात, लेखाधिकारी श्री. मारोती राठोड तसेच इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत सकाळी 11.00 वा. ते 11.02 पर्यंत स्तब्ध् उभे राहून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
