नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , प्रियंवदा येथे वाचन प्रेरणा दिनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली तथा विविध कार्यक्रमाचे आयोजन* – जनता टाइम्स न्यूज

प्रियंवदा येथे वाचन प्रेरणा दिनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली तथा विविध कार्यक्रमाचे आयोजन*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*प्रियंवदा येथे वाचन प्रेरणा दिनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली तथा विविध कार्यक्रमाचे आयोजन

—————————————–

*हात धुवा उपक्रमात विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग*

✍️✍️✍️✍️✍️

*जनता टाइम्स विदर्भ चीफ ब्यूरो:- सौ.अर्चना लोखंडे*

👇👇👇👇👇

*दिनांक:-15.10.2024*

भिवापूर तालुक्यातील प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेश्वरी येथे आज दिनांक 15 ऑक्टोबर रोज मंगळवारला स्वतंत्र भारताचे 11 वे राष्ट्रपती तथा देशाचे मिसाईल म्यान सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, महान लेखक डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून विद्यालयातील इयत्ता 5 ते 12 चा समस्त विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे प्राचार्य मा. राजु शिवणकर सर यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्सवात संपन्न झाला.

या प्रसंगी विचार मंचावर प्रमूख अतिथी म्हणून राजु सागरे सर, विनोद नन्नावरे भारत शेंडे सर फुलचंद ठाकुर सर, रडके मॅडम, तनु भोयर भोयर मॅडम, प्रा .भुजाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समस्त मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यारपण अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

वाचन प्रेरणा दिनाचा औचित्य साधून विद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात प्रामुख्याने ग्रंथदिंडी, ग्रंथालयातील सामुहिक वाचन, व्याख्याने, हात धुवा उपक्रम, वैज्ञानिक कथाकथन, प्रकट वाचन आदी उपक्रम राबविण्यात आले.

तसेच विद्यालयातील कू. काजल लांजेवार, कूं.मानसी मांढरे (इयत्ता 11 वी) आदी विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे.. अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश पाडून भविष्यात ‘वाचाल तर वाचाल ,शिकाल तर टी काल नाही तर तडफडू- तडफडू मराल’असे महत्त्वपूर्ण विधान करून विद्यार्थ्यांना अखंड वाचनासाठी आव्हान केले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजू शिवणकर सर यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या आदर्शजीवन पद्धतीचा अनुकरण करून जीवनात साक्षात उतरवण्याचे आवाहन केले.

यावेळी विचार मंचावरून प्रामुख्याने विनोद ननावरे सर ,राजू सागरे सर,रडके मॅडम ,भुजाडे मॅडम तन्नू भोयर मॅडम आदींनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्याना भावी वैज्ञानिक होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रदीप लोखंडे सर तर आभार प्रदर्शन श्री विनोद नन्नावरे सर यांनी केले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भारत शेंडे सर ,देवराव भोयर, मंडपे ताई, वामन वानखेडे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed