मायानगरी नंतर आता रामटेकमध्ये होणार फिल्मसिटी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*मायानगरी नंतर आता रामटेकमध्ये होणार फिल्मसिटी*
– नवरगाव येथे जागा निश्चित, राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल
राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक:- मराठी चित्रपट सृष्टी आणि बॉलीवूड सारख्या चित्रपट सृष्टीला दर्जेदार चित्रपट देण्यात ग्रामीण भागाचा हातखंडा आहे. याचाच प्रत्यय सैराट, याड आणि विविध चित्रपटातून आला. हीच बाब लक्षात घेता ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हाव यांसाठी रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन राज्य सरकारकडे चित्रपट सृष्टीची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत राज्य सरकार व सांस्कृतिक खात्याने रामटेक तालुक्यांतील नवरगाव येथे चित्रपट सृष्टीला मान्यता दिली असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
सद्यस्थितीत इंस्टाग्राम फेसबुक व अन्य सोशल मीडिया साईटवर नवोदित कलाकारांनी अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. मात्र या कलाकारांची आर्थिक व सभोवतांची परिस्थिती अनुकूल असल्याने हे कलाकार जगासमोर येत नाही. यामुळे ग्रामीण भागात सुध्दा या कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट क्षेत्राशी निगडीत तज्ञ व्यक्तींसोबत दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे बैठक संपन्न झाली . ज्यात मुंबई व कोल्हापूर येथील चित्रपट सृष्टीच्या धर्तीवर नागपूर येथे चित्रिकरणास अनुकल अशा चित्रनगरीची उभारणी निर्णय घेण्यात आला. यात रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी सुचविलेल्या रामटेक तालुक्यातील नवरगाव येथिल जागा निश्चित करून मान्यता देण्यासाठी शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाव्दारे निर्गमित करण्यात आले.
रामटेक येथे निर्माण होणाऱ्या या चित्रनगरीमुळे रामटेकच्या पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळणार आहे. तसेच रामटेकचे नाव मुंबई आणि कोल्हापूरच्या धर्तीवर चित्रपटाच्या चित्रीकरणाला नावारूपाला येईल.
आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नाने रामटेक तालुक्यातील नवरगाव येथे चित्रनगरी येत असल्याने येथील स्थानीक कलावंतांना बेरोजगार युवक – युवतींना कामाची संधी मिळणार असल्याने त्यांनी आमदार जयस्वाल यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
