नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिल्पा ढोमणे यांच्या दोन कादंबर्‍यांचे प्रकाशन: विदर्भ साहित्य संघाचा विशेष कार्यक्रम – जनता टाइम्स न्यूज

शिल्पा ढोमणे यांच्या दोन कादंबर्‍यांचे प्रकाशन: विदर्भ साहित्य संघाचा विशेष कार्यक्रम

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

प्रसिद्ध साहित्यिक प्रा. विजया मारोतकर यांच्या हस्ते झाले प्रकाशन

कादंबरीकार विजया ब्राम्हणकर यांची प्रमुख उपस्थिति

– राजु कापसे (तालुका प्रिनिधी)

रामटेक, २० ऑक्टोबर: विदर्भ साहित्य संघाच्या रामटेकशाखेतर्फे आयोजित विशेष पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शिल्पा ढोमणे लिखित ‘ऋणानुबंध’ आणि ‘अभिलाषा’ या दोन कादंबर्‍यांचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. विजया मारोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने कादंबरीकार विजया ब्राम्हणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

हा प्रकाशन सोहळा राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी वि.सा.संघ रामटेक शाखेचे अध्यक्ष दीपक गिरधर होते. कार्यक्रमाच्या मंचावर प्राचार्य राजुजी बर्वे, लेखिका सौ. शिल्पा ढोमणे, तसेच भाष्यकार डॉ. जगदीश गुजरकर, जयश्री पांगारकर, डॉ. अंशुजा किंमतकर, प्रा. डॉ. गिरीश सपाटे आणि प्रा. डॉ. सावन धर्मपूरीवार हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रा. विजया मारोतकर, विजया ब्राम्हणकर, आणि अन्य मान्यवरांचा रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर, वि.सा.संघाच्या वतीने लेखिका शिल्पा ढोमणे आणि त्यांचे पती प्रवीण ढोमणे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबाचे रोपटे आणि स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

जयश्री पांगारकर आणि डॉ. जगदीश गुजरकर यांनी अनुक्रमे ‘ऋणानुबंध’ व ‘अभिलाषा’ या कादंबर्‍यांवर समिक्षणात्मक भाष्य केले. भाष्यकारांनी दोन्ही कादंबऱ्या विज्ञानवादाद्वारे मानवतावादी मूल्ये जोपासणाऱ्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या असल्याचा अभिप्राय दिला.

प्रा. विजया मारोतकर यांनी कादंबरीत वैद्यकीय व कायदेविषयक अभ्यासपूर्ण विषय हाताळणीसाठी लेखिका शिल्पा ढोमणे यांचे कौतुक केले. विजया ब्राम्हणकर यांनी कादंबरीतील मानवी मूल्यांची गुंतागुंत आणि लेखनातील नियोजनबद्धता अधोरेखित केली.

प्राचार्य राजू बर्वे यांनी लेखिकेस अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या, तर दीपक गिरधर यांनी अध्यक्षीय विचार मांडले. विदर्भ साहित्य संघ शाखेचे कार्याध्यक्ष डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सचिव डॉ. पवन कामडी यांनी सुञसंचालन केले, तर उपाध्यक्ष प्रा. डॉ. गिरीश सपाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर, रसिक-श्रोते, साहित्याभ्यासक, विद्यार्थी आणि इतर अनेकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. वि.सा.संघाच्या रामटेक शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed