नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नाट्यप्रयोगासाठी प्रल्हाद नाट्य रंगभूमी सज्ज दर्जेदार कलाकृतींची मिळणार मेजवानी – जनता टाइम्स न्यूज

नाट्यप्रयोगासाठी प्रल्हाद नाट्य रंगभूमी सज्ज दर्जेदार कलाकृतींची मिळणार मेजवानी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

प्रशांत शहारे / भंडारा

दिवाळीनंतर झाडीपट्टी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील गावागावात मंडई उत्सवाचे आयोजन होत असून संगीत नाटकांचे प्रयोग नाट्य रसिकांची मेजवानी ठरत असल्याने दर्जेदार नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणासाठी देसाईगंज वडसा येथील प्रल्हाद नाट्य रंगभूमी सज्ज झाली आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात संगीत नाटकांची परंपरा जुनी आहे. खरीप हंगामातून मिळालेल्या मिळकतीवर मंडई उत्सवाचे आयोजन करून दिवसा पारंपरिक लोककलेचे सादरीकरण कलावंत करीत असतात. तर रात्रीला संगीत नाटके होत असतात. या नाट्यप्रयोगासाठी देसाईगंज वडसा येथे नाट्य कंपनीची कार्यालये आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना नाट्यप्रयोग ठेवण्यासाठी सोयीचे जाते. राज्यातून अनेक ठिकाणाहून कलावंत येथे मुक्कामी असतात. अर्धशतकाहून अधिक नाट्य कंपनी कार्यालये असले तरी मोजक्याच नामवंत नाट्य रंगभूमीकडे आयोजकांचा लोंढा असतो. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, कविवर्य प्रल्हाद मेश्राम यांच्या प्रल्हाद नाट्य रंगभूमीचा देखील यात समावेश आहे. कौटुंबिक, सामाजिक स्तरावर लिहिलेले नाटकाचे कथानक प्रेक्षकांना नाट्यप्रयोग पाहायला भाग पाडते. सोबतच विनोद, नृत्य, लावणी व कलावंतांचा यशोचित अभिनय मन लुभवून टाकते. मुंबई, पुणे येथून अभिनयासाठी आलेले स्त्री-पुरुष कलावंत प्रेक्षकांचे आकर्षण असते. नाट्यलेखनाला उत्कृष्ठ अभिनयाची जोड देणारे कलावंत प्रल्हाद नाट्य रंगभूमीची ख्याती आहे.
‘प्रल्हाद नाट्य रंगभूमी निर्मित ‘शेवटची आंघोळ’ नाटकाचा नाट्यप्रयोग रसिकांच्या मनात घर करून गेला. यात लेखकाने भूमिकेत केलेले शब्दांकन मनाला हेलावून टाकणारे आहे. कलावंतांनी देखील भूमिकेला योग्य न्याय दिल्याने संपूर्ण झाडीपट्टीत शेवटची अंघोळ नाटकाचे प्रयोग जनमानसात नावलौकिक मिळवून गेले. यापूर्वीही सदर रंगभूमीने शिदोरी, सरणावरची लाकडं, मजुरी, फाटका पदर मायेचा अशी दर्जेदार नाटके झाडीपट्टी रंगभूमीवर गाजवली आहेत. ही व्याप्ती आजही प्रल्हाद मेश्राम यांच्या नेतृत्वात कायम असल्याने जनतेशी नाळ जुळली आहे. यावेळी देखील शेवटची आंघोळ, पेटलेल्या चुली, पाठ थोपटणारा बाप यासारखी दर्जेदार नाटके नामवंत कलाकारांच्या संचात उपलब्ध असल्याने नाट्य रसिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन प्रल्हाद नाट्य रंगभूमी तर्फे करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now