नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , जगा आणि जगवा हसा आणि इतरांनाही हसवा*—— *मा. आरती उके मॅडम यांचे प्रतिपादन* ——————————- *जनता टाइम्स फाउंडेशन अंतर्गत मा. आरती उके मॅडम यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शूज -सॉक्स भेट वस्तू वितरण* – जनता टाइम्स न्यूज

जगा आणि जगवा हसा आणि इतरांनाही हसवा*—— *मा. आरती उके मॅडम यांचे प्रतिपादन* ——————————- *जनता टाइम्स फाउंडेशन अंतर्गत मा. आरती उके मॅडम यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शूज -सॉक्स भेट वस्तू वितरण*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*जगा आणि जगवा हसा आणि इतरांनाही हसवा*—— *मा. आरती उके मॅडम यांचे प्रतिपादन*

——————————-

*जनता टाइम्स फाउंडेशन अंतर्गत मा. आरती उके मॅडम यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शूज -सॉक्स भेट वस्तू वितरण

————————————

*मा आरती उके मॅडम यांच्या जन्मदिनी ज.टा.फा. तर्फे जाहीर सत्कार*

——————————–

*दिनांक:- 23 ऑक्टोबर 2024*

*मुख्य पत्रकार (महाराष्ट्र):- सौ. अर्चना लोखंडे*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

“मनुष्य हा समाजशील प्राणी असल्याने समाजाशिवाय त्याचा सर्वांगीण उद्धार होणे शक्यच नाही, तेव्हा स्वतःसाठी जगता- जगता समाजातील दिनदलित, पीडित, गरीब, गरजू शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी जगा आणि जगवा, हसा आणि इतरांनाही हसवा, प्रसंगी शाळाबाह्य उपेक्षित आर्थिक कमकुवत चिमुकल्या विद्यार्थ्यांना निस्वार्थपणे सढळ हाताने थोडी का होईना मदत केले तर समाजात कसलीच उणीव राहणार नाही नव्हे तर एक सशक्त एकीकृत बलशाली राष्ट्रीय पिढी घडल्याशिवाय राहणार नाही” असे मार्मिक प्रतिपादन वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी उमरेड विभाग चे मा. आरती उके मॅडम यांनी प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी येथे आज दि. 23 ऑक्टोबरला जनता टाइम्स फाउंडेशन( एनजीओ) या सामाजिक संस्था अंतर्गत आयोजित सत्कार तथा शालेय विद्यार्थ्यांना शूज -साक्स भेट वस्तू वितरण समारंभात उद्घाटक- सत्कारमूर्ती स्थानावरून केले.

विशेष म्हणजे वन्यजीव वनपरिक्षेत्र उमरेड विभागाचे अधिकारी मा. आरती उके मॅडम यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून जनता टाइम्स फाउंडेशन (एनजीओ )सामाजिक संस्था अंतर्गत त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून सत्कार तथा गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी शूज भेटवस्तू वितरण समारंभाचे आयोजन जनता टाइम्स फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. निखिलेश कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला होता.

यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य मा. राजू शिवणकर सर ,जनता टाइम्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजकुमार शेंडे सर ,जनता टाईम फाउंडेशनचे सचिव प्रदीप लोखंडे सर, विदर्भ ब्युरो चीफ महेश शिवणकर सर, वन्यजीव विभागाचे सहाय्यक क्षेत्ररक्षक मा. नंदेश्वर साहेब, वन्यजीव पर्यटन विभाग प्रमुख मा. संजय खंदोडे साहेब ,संस्था विश्वस्त मा. राकेश उमरकर सर ,संस्था विश्वस्त मा. राजू सागरे सर, मुख्य पत्रकार( महाराष्ट्र) सौ. अर्चना लोखंडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक मा. विलास तांबे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटक स्थानावरून ते बोलताना पुढे म्हणाले की हा सामाजिक दायित्वाचा वसा पुढे मी वन्यजीव या विभागात तीन वर्ष कार्यरत असेपर्यंत असाच नियमित ठेवणार असून या विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमातून गरजेनुसार भेटवस्तू जनता टाइम्स फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून योगदान करतच राहणार शिवाय या सामाजिक बांधिलकीतून नवनिर्माण पिढी घडवण्यासाठी समाजातील इतरही सेवाभावी व्यक्तींनी सुद्धा हातभार लावण्याचे ही आव्हान यावेळी केले.

या मंगलमय प्रसंगी जनता टाइम्स फाउंडेशन तथा प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कारमूर्ती मा. आरती उके मॅडम यांच्या जन्मदिन निमित्याने केक कापून त्यांना उज्वल तथा उदंड आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या तसेच जनता टाईम फाउंडेशन च्या माध्यमाने सामाजिक कार्यात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक- सत्कारमूर्ती मा. आरती उके मॅडम यांच्या शुभहस्ते इयत्ता पाच ते सातच्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना सूज साक्ष भेटवस्तू देण्यात आले

तसेच जनता टाइम्स फाउंडेशन यांच्या शुभ हस्ते येथील गरजू विद्यार्थ्यांना शूज -सॉक्स वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून जनता टाईम्स फाउंडेशनचे अध्यक्ष मा. निखिलेश कांबळे सर बोलताना म्हणाले की मा. आरती उके मॅडम यांनी देशातील संत- महापुरुषांच्या विचारधारेचा अनुसरण स्वतःच्या जन्मदिनानिमित्त जनता टाइम्स फाउंडेशन च्या माध्यमातून येथील इयत्ता पाच ते सातच्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना पायाच्या रक्षणार्थ सूज -सॉक्स भेटवस्तू देऊन समाजा पुढे जो आदर्श ठेवला तो नक्कीच दानशूर उदारवादी अधिकारी- कर्मचारी वर्गासाठी प्रेरणादायी ठरेल किंबहुना क्षमतेनुसार स्वतःच्या उत्पन्नाचा 33% हिस्सा समाज उद्धारासाठी केल्यास जनता टाइम्स फाउंडेशन सदैव त्यांच्या पाठीशी असेल नव्हे तर त्यांच्या पण फाउंडेशन तर्फे जाहीर सत्कार , गुणगौरवाने सन्मानित करण्यात येईल यासाठी स्वयंप्रेने दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजू शिवणकर सर, जनता टाइम्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजकुमार शेंडे सर, संस्था विश्वस्त मा. राकेश उमरेडकर सर ,शालेय विद्यार्थी प्रतिनिधी कु. काजल लांजेवार (11वी) आदींनी आपल्या मनोगतातून आरती उके मॅडम यांच्या सामाजिक बांधिलकी तथा सेवाभावी वृत्तीचे गुणगौरव केले तथा उपस्थितांना समाज हितासाठी पुढे सरसावण्याचे आवाहन करून जन्मदिनानिमित्त पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

यावेळी विद्यार्थ्यांना पेढे भरून त्यांचे तोंड गोड करण्यात आले .

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माननीय भारत शेंडे सर , देवराव भोयर, मंडपे ताई , विनोद ननावरे सर,फुलचंद ठाकूर सर, रडके मॅडम, तन्नू मॅडम, विद्यार्थी प्रतिनिधी कु. समीक्षा डांगरे, नीतू नरुले ,सानिया मांढरे ,ऋतिका भोयर कु.अंजली लांजेवार, कु. मानसी मांढरे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now