प्रहारचे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू उतरले मैदानात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

प्रहारचे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू उतरले मैदानात
👉🏻 भर पाऊसात हजारोच्या संख्येत नागरिकांची गर्दी, डॉ. सुगत यांची प्रहारची बॅट सगळ्या बाउंडऱ्या करणार पार, बच्चू कडू
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
अर्जुनी/मोर. :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र मतदार संघ क्रमांक- 63 क्षेत्राचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू हे अर्जुनी मोरगाव येथे नामांकन दाखल व प्रचार दरम्यान अर्जुनी मोरगाव येथे दाखल झाले असुन हजारोच्या संख्येत मोठ्या जन समुद्यायाने संपूर्ण अर्जुनी मोर. क्षेत्रव्यापले असुन इतर उमेदवारांचे प्रहार च्या उमेदवाराकरिता आलेला जनाधार पाहून भारावून गेले.
इकडे कांग्रेस पक्षात अर्जुनी मोर. क्षेत्रातील बंडाचे सुर पाहता कांग्रेस कार्यकर्त्यांनी अर्जुनी मोर. मतदार संघात आयात केलेला उमेदवार परत करा असे आग्रह कांग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांचा ताफा अडवून विरोध करताना कार्यकर्ते दिसत आहे.
बच्चू कडू यांनी अर्जुनी मोर. येथे डॉ. सुगत चंद्रिकापुरे प्रचारदरम्यान भर पाऊसात नागरिक रस्त्यावर रॅलीत उभे आहेत विदर्भात धान क्षेत्रात आम्हाला गडी मिळाला डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांची प्रहारची बॅटिंग सगळ्या बाउंडऱ्या पार करुन मुंबई ला चेंडू पोहचणार, येणारा मुख्यमंत्री हा प्रहार ठरवेल तोच होईल, जीवाचे रान करुन पण सुगत दादा ला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असाही बच्चू कडू यांनी माध्यमाद्वारे सांगितले आहे.
प्रहारच्या उमेदवाराने अर्जुनी/मोरगाव सगळ्या विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराचे धाबे चांगलेच दानाणले असल्याचे जन मुखातून चर्चेत दिसत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
