*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्या खरेदी, ग्राहकांची झाली तोबा गर्दी
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

-
*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्या खरेदी, ग्राहकांची झाली तोबा गर्द*
————————————-+
*भंडारा येथिल बाजारपेठेत वाहतुकीचा खोळंबा*
29.10.2024
*जनता टाइम्स जटा टीवी चॅनल*
*इन्साफ चाहता है! इंडिया*
*मुख्य पत्रकार ( महाराष्ट्र):- सौ अर्चना लोखंडे*.
*भंडारा*:ऐन दिवाळी सारख्या राष्ट्रीय सणासुदीच्या दिवसांत भंडारा शहरातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदसाठी ग्राहकांची एकच तोबा गर्दी उडाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने दुचाकी चारचाकी वाहन चालकांची दमछाक उडाल्याचे चित्र ईथे पाहायला मिळाले.
भंडारा हे शहर जिल्ह्याचे मध्यवर्ती बाजारपेठेचे एकमेव केंद्र असल्याचे सभोवतालचे सर्वच ग्रामीण नागरीक खरेदी विक्री साठी ईथे येत असतात. दरम्यान बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर अनेक छोटी मोठी दुकाने थाटलेली असल्याने रहदारी साठी खूपच अरुंद रस्ता उपलब्ध होत असल्याने याच मार्गाने दोंचाकी चारचाकी तथा पायी जाणारे नागरीक याना रस्ता पार करतांना तारेवरची कसरत करावी लागते.
परिणामी अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होउन कित्येकदा किरकोल स्वरूपाचे अपघात होण्याचे नाकारता येत नाही. असे असतानाही येथील वाहतूक नियंत्रक पोलिस विभाग केवळ बघ्यांची भुमिका घेतात की काय असा सवाल येथील वाहतुकीच्या कोंडीत सापडलेला सामान्य नागरीक ग्राहक तथा वाहनचालक करीत आहे.
बाजारपेठेतील वाहतूक कोंडीतून सुटकरा मिळण्यासाठी ईथुन येजा करणाऱ्या चारचाकी वाहनांना प्रतिबंध करणे गरजेचे असल्याचे येथिल नागरिकांचे प्रतिक्रीया असल्याचे समजते.
खरे पाहता दिवाळी सारख्या राष्ट्रीय सणासुदीच्या तोंडावर हजारो ग्राहकांची रेलचेल येथे बघायला मिळते. यात प्रामुख्याने कपडे, किराणा, मुलांचे खेळणे, फटाके, पणत्या, लमांदिवा ,रागोली, विद्युत सिरीज माला, मिठाई ,फळे, भाजीपाला आदि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी होत असते.
बाजारपेठतील खरेदी तथा वाहतूक सुलभ होण्यासाठी संबंधीत वाहतूक नियंत्रण पोलिस विभागाने योग्य पावले उचलण्याची मागणी ग्राहक नागरीक तथा वाहनचालकांनी केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
