नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सींदेवाही पोलिस प्रशासनातील कर्तव्यदक्ष बीट जमादार शंकर राऊत सेवानिवृत्त ! – जनता टाइम्स न्यूज

सींदेवाही पोलिस प्रशासनातील कर्तव्यदक्ष बीट जमादार शंकर राऊत सेवानिवृत्त !

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

सुनील गेडाम

सिंदेवाही :: पोलिस शासन आणि नागरिक यामधील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळनार प्रशासन , याच पोलिस प्रशासन मधील कर्तव्य करीत असणारे अधिकारी आपल्या कामगिरी ने
जनतेच्या मनात आपली छाप सोडत असतात,आणि कर्तव्य मधून सेवा निवृत्त झाल्यावर ही त्यांना तसाच आदर समाजात मिळतो ,जाणून घेऊया आज अश्याच सिंदेवाही पोलिस प्रशासन मधील कार्यरत असणारे नुकतेच सेवा निवृत्त झालेले बीट जमादार शंकर राऊत यांच्या विषय, शंकर श्रीराम राऊत सहाय्यक फौजदार बं नं ११३५ हे सिंदेवाही पोलिस स्टेशनला २७/ ०९ / २०१९ ला बदली होऊन सिंदेवाही पोलिस स्टेशनला रुजू झाले , सिंदेवाही पोलिस स्टेशन मधील शंकर राऊत यांच्या कडे कामाचा कितीही व्याप असला तरी कर्तव्य वर किंवा बाहेर असताना सर्व सामान्य नागरिक शी अगदी प्रेमाने आदराने बोलायचे ,त्या मुळे जनसामान्य नागरिक मध्ये शांत ,संयमी ,प्रेमळ बीट जमादार म्हणून ओळख निर्माण झाली, पोलिस स्टेशन मध्ये कर्तव्य वर असताना आलेल्या नागरिक बसवून त्यांच्या कडून तक्रारी ची विचारपूस करून नीट समजवून त्यांची तक्रार दाखल करून घेत होते ,तक्रार दाखल केल्या नंतर ते नागरिकांना वाचण्यास देत होते, व त्यानंतर ते पुढील कारवाही साठी वरिष्ठ अधिकारी कडे पाठवत होते , कामाचा अत्याधिक व्याप असताना गरज पडेल तेव्हा जातीने हजर होत होते , पोलिस प्रशासन मध्ये कर्तव्य करीत असताना कधीही सुट्टी न घेतलेला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा सन्मान देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला होता , नेहमी हसतमुख असणारे व संयमी अधिकारी म्हणून त्याची पोलिस प्रशासन मध्ये ओळख निर्माण झाली होती , तत्का पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या कार्यकाळ मध्ये पोलिस स्टेशन च्या भिंतीवर जे चित्र काढले त्या मध्ये हुबेहूब शंकर राऊत याचे चित्र दिसते , सामान्य माणसाला आपुलकी ,सन्मान देणारं ते चित्र आहे , प्रत्येक नागरिक जेव्हा ते चित्र बघतात तेव्हा त्यांना शंकर राऊत ची आठवण होतेच , या मुळे काही पत्रकार बांधव सुद्धा मोठ्या आपुलकी ने शंकर मामा सुद्धा म्हणतात , शंकर राऊत हे सिंदेवाही पोलिस स्टेशन मधून ३१/१०/२०२४ रोजी आपल्या कर्तव्य मधून सेवा निवृत्त झाले ,पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी त्याचा कार्यालय मध्ये सेवानिवृत्त बाबत
सत्कार सुद्धा केला,
सेवा निवृत्त झाल्यावर अधिकारी व्यक्ती ला तेवढा कुणी मान देत नाही , पण सेवा निवृत्त होऊन सुद्धा आज शंकर राऊत यांना नागरिक सन्मान देतात ,ही त्यांच्या कर्तव्य ची जणू पावतीच आहे ,म्हणून असा अधिकारी सेवा निवृत्त झाल्या वर नागरिकांच्या मनात हळहळ निर्माण होते,आणि ते भाग्य शंकर राऊत यांना लाभलं आहे,असा अधिकारी होणे नाही,असा सुरू नागरिक मध्ये उमटत आहे,कर्तव्य शिल असणाऱ्या अश्या अधिकाऱ्याला सन्मान पूर्वक सलाम करून त्यांना पुढील आयुष्यासाठी जनता टाइम्स परिवार कडून हार्दिक शुभेच्छा.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now