घाटकुरोडा रेती घाट क्र. 1 मध्ये रेती माफिया कडून शेतात व घरी होते अवैध साठवणूक प्रशासनाने घेतले कुंभकरणीय झोपेचे सोंग

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

घाटकुरोडा रेती घाट क्र. 1 मध्ये रेती माफिया कडून शेतात व घरी होते अवैध साठवणूक प्रशासनाने घेतले कुंभकरणीय झोपेचे सोंग
👉🏻 तलाठ्याची वर कार्यवाही होणार का ? अवैध साठा तात्काळ जप्त करुन कार्यवाही करा, प्रशासनाची भूमिका संशयास्पद.
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- तिरोडा तालुक्यात वैनगंगा नदीच्या काठी घाटकूरोडा गाव असुन नदीच्या काठावर 3 रेतिघाट आहेत घाट क्रमांक 1 मधून रेती माफियानी मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उत्खनन करुन शेत जमिनीत व घरी मोठ्या प्रमाणात साठवणूक केलेली आहे.
सदर अवैध उत्खननाला संबंधित तलाठी वरिष्ठानंचा पाठिंबा असल्याचे चर्चासत्र गावात जन मुखात मोठ्या प्रमाणात सुरु असुन सर्व प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र मोठया प्रमाणात रेतीची चोरी होत असून माफियाचा आर्थिक दडपणात पडलेली असल्याचे चर्चेत
तलाठ्यांना, यंत्रणेला लहान-लहान रेतीचे ट्रॅक्टर मोठया पाहाडा सारखे दिसतात त्या पहाडांवर तलाठी चडून काही अंतर गाठतात व धनवर्षा झाली की उतरून सांगतात पहाड होतेच नाही. धनवर्षा एवढी मोठ्या प्रमाणात होते की, ट्रॅक्टरच पहाडच जागेवरून गायब होतांना दिसतात, मोठ-मोठे पहाडा सारखे असलेले रेतीचे ढीग दिसून सुद्धा दिसलेच नाही असा नवटंकीचा पात्र सद्या यंत्रणा करत आहे. प्रशासनाने कुंभकरणीय झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र दिसत आहे.
गावा-गावात एकच म्हणी, साहेबांचे पगार होते कमी म्हणून रेतीचोरी दिसूनही यंत्रणा करते माफिया सोबत अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही.
घाटकूरोडा गावात 1) कृष्णा भांडारकर यांच्या घराजवळ 1 अवैध रेतीचा साठा, 2) हंसराज डोंगरवार यांचा गावातील जागेवर 1 रेतीचा अवैध साठा, 3) शामू भेलावे यांचा शेतात 1 अवैध रेतीचा साठा 4) अर्जुन भेलावे यांच्या गावातील जमिनीवर 1 रेतीचा अवैध साठा आहे. 5) सुनिल भांडारकर यांच्या शेतीसमोर 1 रेतीचा अवैध साठा आहे. संबंधित तलाठी माध्यमाना यापूर्वी सांगितले रेतीचा अवैध साठा कुठे आहे हे माहित नाही असे सांगत असत, आता मात्र साठ्याचे ठिकाणा माध्यमाद्वारे यंत्रणेला सांगण्यात येत आहे. आता तरी यंत्रणा याला जबाबदार कर्मचारी/अधिकारी, अवैध रेती साठवणूक करणारे यांच्यावर जमीन महसूल संहिता अधिनियमा 1966 अंतर्गत कार्यवाही करून अवैध रेतीचा साठा जप्त करेल का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी या प्रकरणाकडे तातळीने लक्ष देऊन कार्यवाही करतील का ? यांच्या निगराणीत रेती चोरी सुरु की, त्यांचा दुर्लक्ष असा संभ्रम आता निर्माण होत आहे. जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज
सर्व प्रकाराला संबंधित तलाठी यांच्या कर्तव्य कार्यप्रणालीवर ठपका ठेवून त्यांना जबाबदार धरून तलाठी यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तहसीलदार तिरोडा व उपविभागीय अधिकारी (SDO), जिल्हा खनिकर्म अधिकारी कोणती कार्यवाही करतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधून आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
