सिंदेवाही पंचायत समिती मधूनं घरकुलचे शेवटचे बिल साठी लाभार्थी रोजच पायपीट
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

सिंदेवाही :: लोनवाही मधील निवासी सुरज गेडाम यांना रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत सन २०२०- २१ मधील कालावधीत घरकुल मंजूर झाले,घराचे संपूर्ण बांधकाम करून शेवटच्या बिल साठी संपूर्ण कागदपत्रे पंचायत समिती च्या कार्यालय मध्ये दिले ,पण पालथ्या घड्यावर पाणी या प्रमाणे पंचायत समिती मधील अधिकारी कडून शेवटच्या बिल साठी लाभार्थी ना रोजच पायपीट करावी लागते , आज बिल मिळेल या आशेवर लाभार्थी बसला आहे पण घरकुल चे शेवटचे बिल मिळण्याचा पत्ताच दिसत नसल्याने घरकुल लाभार्थी पूर्ण पने त्रस्त झाला आहे, घर बांधकाम करण्यासाठी आणलेल्या साहित्य चे बिल साठी दुकानदार वारंवार पैश्याची मागणी लाभार्थी कडे करीत आहे , घरकुल चे बिल निघाले की संपूर्ण रक्कम देऊ असे धारणा लाभार्थी ची आहे पण पंचायत समिती मधील भोंगळ कारभार मुळे लाभार्थी असलेल्या सुरज गेडाम ला शेवटच्या बिल साठी पायपीट करावी लागत आहे , तरी पण मागील 20 दिवसापासून रोजच्या रोज होणारी पायपीट कधी थांबणार , की असाच त्रास आणि सामान्य नागरिक होणार हे कळायला अधिकारी वर्गाकडे उत्तर नाही .

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
