नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा योग्य विकास करणार-पर्यटक महर्षी चौकसे – जनता टाइम्स न्यूज

ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा योग्य विकास करणार-पर्यटक महर्षी चौकसे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा योग्य विकास करणार-पर्यटक महर्षी चौकसे*

अनुपम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रामटेक मतदार संघात अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत.या स्थळांना मोठा ऐतिहासिक वारसा आहे.मात्र इतिहासाने समृद्ध अशा या ऐतिहासिक स्थळांचा हवा तसा विकास झालाच नाही.आपण निवडून आल्यास रामटेक मतदार संघातील विवीध ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा सुयोग्य विकास करणार असल्याचे प्रतिपादन विख्यात पर्यटक महर्षी चंद्रपाल चौकसे यांनी केले.रामटेकची भूमी प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनित झाली आहे.रामायण महाकाव्यात रामटेकचा उल्लेख आहे.याच भूमीत महाकवी कालिदासांनी जगद्विख्यात मेघदूत महाकाव्याची रचना केली.मनसर येथे बौद्ध धर्माचे मौर्यकालीन महान वास्तू आहे.या ऐतिहासिक स्थळाचा योग्य विकास झाल्यास परदेशातील भाविक,पर्यटक येथे आकर्षित होऊन पाहायला येतील.याद्वारे डॉलरचा पाऊस पाडला जाऊ शकतो असे चौकसे म्हणाले.

पारशिवनी तालुक्यातील आदिवासी बांधवांचे विख्यात कुंवारा भीमसेन देवस्थान,नगरधन येथील राजा रुद्रसेन यांचा वाकाटक कालीन किल्ला,देवलापार जवळच्या डोंगलताल येथे महाराणी दुर्गावती यांचा ऐतिहासिक किल्ला,रामटेक येथील श्री क्षेत्र शांतिनाथ मंदिर असे एक ना अनेक ऐतिहासिक स्थळे या मतदार संघात आहेत.दुर्लक्षामुळे या स्थळांचा प्रचार-प्रसार झाला नाही. परिणामी ही महान ऐतिहासिक स्थळे विकासापासून आजही बरीच दूर राहली.निवडून आल्यास शासनाकडे सतत पाठपुरावा करून या व अन्य सर्व ऐतिहासिक स्थळांचा परिपूर्ण विकास करणार असे चौकसे म्हणाले.यामुळे पर्यटन क्षेत्राला आणखी चालना मिळून रोजगाराच्या मोठ्या संध्या प्राप्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

११ नोव्हेंबरला रामटेक मतदार संघाचे उमेदवार चंद्रपाल चौकसे यांनी नंदापुरी,नेरला दुधाळा,बारशे हिंगणा,खापरखेडा,तुमान,तरोडी खापरखेडा तेली,पारडीकला,पारडी खुर्द,राजोली,नवेगाव रेल्वे,आष्टी, तारसा,निमखेडा,रेवराल,खरडा, अरोली आदी गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला.मतदारांनी चौकसे यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत महिलांनी आरतीने ओवाळणी केली.विविध धार्मिक स्थळांच्या दुर्लक्षामुळे यावेळी पर्यटक महर्षी व्यथीत दिसून आले.

दौऱ्यात त्यांच्यासमवेत सुरेश पिसोडे,श्यामदेवी पिसोडे,केशवराव चापले,मनोहर गुप्ता,प्रियंका नौकरकार,अनिल मनगटे,सोनम मनगटे,मनीषा बडवाईक,माधुरी देवतळे,अंजिरा मनगटे,शुभू कडू , चंद्रकला गेडाम,महेंद्र कडू,निखिल झलके,रीता कडू,नितेश हिवसे, अशोक बरबटे,शारदा बरबटे, हेमराज ढोके,हेमराज कापसे, धर्मराज पाटील,भास्कर टाले,श्याम पायतोडे,यश पायतोडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed