जिल्हाधिकारी यांचा उपस्तित रूट मार्च व मॉब डिस्पोजल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*जिल्हाधिकारी यांचा उपस्तित रूट मार्च व मॉब डिस्पोजल*
जिल्हाधिकारी व नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थित रूट मार्च
राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक: रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत १२ नोव्हेबेर ला दुपारी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ संबंधाने जिल्हाधिकारी विपिन इटनकर व नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनत रामटेक शहर मध्ये रूट मार्च व मॉब डिस्पोजल घेण्यात आले. रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, रामटेक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, अरोली ठाणेदार स्नेहल राऊत , देवलापार ठाणेदार नारायण तुरकुंडे सहित एकूण ०७ अधिकारी, ५४ अमलदार, आरसीपी पथक, एसएसबी पथक हजर होते. रूट मार्च पोलीस स्टेशन रामटेक, गांधी चौक, आंबेडकर चौक ते बस स्टँड चौक असा घेण्यात आला. रूट मार्चमध्ये विधानसभा निवडणूक संबंधाने कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही.याबाबत सूचना जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिल्या. गर्दीवर नियंत्रण कसे करता येईल या करिता बस स्टैंड चौक येथे प्रातक्षीक घेण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
