राष्ट्रीय आदर्श विद्यालय द्वारा मतदार जागृती
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*राष्ट्रीय आदर्श विद्यालय द्वारा मतदार जागृती*
प्रतिनिधी: नवेगाव खैरी. दिनांक १२/११/२०२४
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती अभियानांतर्गत राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे संस्थेचे सचिव मयंकराव देशमुख व केंद्र प्रमुख चेतना बोबडे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १२ नोव्हेंबरला मतदान जागृती रॅलीच्या माध्यमातून नवेगाव खैरी परिसरात जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चन्ने व ज्येष्ठ शिक्षक साक्षोधन कडबे यांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावून १००% मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वश्री शिक्षक अनिल कोल्हे, प्रशांत पोकळे, दिलीप पवार, सतीश जुननकर, शैलेंद्र देशमुख, अमित मेश्राम, अर्चना येरखेडे, प्रा. अरविंद दुनेदार, प्रा. मोहना वाघ, रितेश मैंद कार्यालयीन कर्मचारी गोविंद कोठेकर, लीलाधर तांदुळकर, राशिद शेख, मोरेश्वर दुनेदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. मतदार जनजागृती रॅलीमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space