नवेगाव (देशमुख) येथे “का रक्त पिता गरिबांचे”?,*या तीन अंकी नाट्य प्रयोगाचे आयोजन*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*नवेगाव (देशमुख) येथे “का रक्त पिता गरिबांचे”?,*या तीन अंकी नाट्य प्रयोगाचे आयोजन*
—————————————–
*दिनांक:-15.11.2024*
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*इन्साफ चाहता है! इंडिया*
*मुख्य पत्रकार महाराष्ट्र:-सौ अर्चना प्रदीप लोखंडे*
नवेगाव (देशमुख):-खास कार्तिक पौर्णिमेच्या काल्यानिमित्त जय जवान नाट्यकला मंडळ नवेगाव( देशमुख )यांच्या सौजन्याने चंद्रकमल थेटर्स शिंदेवाही/ वडसानिर्मित मा. संजय ठवरे यांच्या हस्तलिखित, प्राध्यापक शेखर डोंगरे यांच्या प्रमुख दिग्दर्शनाखाली तथा प्राध्यापक के. आत्माराम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात महान सामाजिक ,कौटुंबिक ,विनोदी संगीत प्रधान तीन अंकी नाट्यप्रयोग” का रक्त पिता गरिबांचे”? या नाट्यप्रयोगाचे आयोजन भिवापूर तालुक्यातील नवेगाव( देशमुख) येथील हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणावर बंद शामियानात दिनांक 16 नोव्हेंबर 2024 शनिवारी रात्रीला ठीक 10.30 वाजे केले आहे.
विशेष म्हणजे या नाट्यप्रयोगा सोबतच याच दिवशी शनिवारला रात्री 7.30 वाजे एकाच तिकिटात नाट्य प्रयोग तथा डान्स प्रयोगाच्या संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांच्या मेजवानीला असणार आहे.
सदर नाट्यप्रयोगातील प्रमुख कलावंत दिग्दर्शक- निर्माता मा.प्रा. शेखर डोंगरे, प्राध्यापक के. आत्माराम, विश्वास पुडके, लोकेश कुमार, चिदानंद सिडाम, स्वप्नील बनसोड, महेंद्र गोडाणे, मिस पोर्णिमा तायडे, मिस पायल, मिस मनीषा देशपांडे ,मिस ज्ञानेश्वरी प्रभाकर आदी कलावंत आपल्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
सदर कार्यक्रमाचा उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते मा. प्रमोदभाऊ घरडे यांच्या शुभहस्ते मा. दयारामजी झोडापे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी सहउद्घाटक म्हणून कारगाव सर्कलचे पंचायत समिती सदस्य कृष्णाजी घोडेस्वार, उपाध्यक्ष म्हणून रामोजी उईके सर, विशेष अतिथी म्हणून जनता टाइम्स फाउंडेशन (एनजीओ) चे सचिव मा. प्रदीप लोखंडे सर ( प्रि. मा. वि. सालेशहरी), सौ.रीना शहाणे (पोलीस पाटील नवेगाव देशमुख), सौ. अश्विनी बंडोजी गायकवाड (सरपंच ग्रामपंचायत नवेगाव देशमुख ),पांडुरंग मोरे (माजी सरपंच ग्रामपंचायत नवेगाव देशमुख) ,सोमेश्वर डडमल (माजी उपसरपंच नवेगाव देशमुख), गजानन महाले (ग्रामपंचायत सदस्य ),वैभव डडमल (उपसरपंच नवेगाव देशमुख), बंडूजी गजबे (ग्रामपंचायत सदस्य), सौ शोभा गणवीर( ग्रामपंचायत सदस्य), वर्षा जीवतोडे (ग्रामपंचायत सदस्य), सुजाता गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य नवेगाव देशमुख) आदी समस्त मान्यवर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी परिसरातील समस्त नाट्यप्रेमींनी या सुवर्णसंधीच्या लाभ घेण्यासाठी अतिशय अल्प तिकीट दरात खुर्चीला 100/ रुपये तर दरी स्थानासाठी( स्त्रिया व पुरुष) यांना फक्त 70/ रुपये या अल्प दरात आपापली जागा आरक्षित करून एका तिकिटात दुहेरी लाभ घेण्याचे आव्हान या कार्यक्रमाचे आयोजक- संयोजक मा नानेश्वर ठाकरे , मा.धर्मेंद्र शंभरकर, उमेश मांढरे यांनी केले आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space