नीच मानसिक प्रवृत्ती मुळे सिंदेवाही तालुक्यात उफाळून आलाच जातीवाद !*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

सिंदेवाही :: सध्या विधानसभा निवडणूक संपली असून मतदारांनी आपल्या मतदान चा हक्क बजावला, मतदान प्रशासन च्या सहकार्य ने शांततेत पार पडले, निवडणूक शांततेत पार पडावी या साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती, आचार संहिता असल्याने सगळे नागरिक सहकार्य करीत होते,सगळी कडे शांतता व सुवस्था आबाधित असतांना काही नीच व जातीवाद च्या कुजलेल्या मानसिक प्रवृत्ती नि या शांततेला सुरुंग लावून जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, नेमक प्रकरण काय पूर्णपणे समजून घेऊया,सिंदेवाही तालुक्यातील मौजा कन्हाळगाव या गावात सर्व जाती व पंथाचे लोक एकमेकांशी मिळून व मिसळून राहतात, दरवर्षी गावातील एकोप्याने कार्तिक पौर्णिमा निमित्त संपूर्ण नागरिकां कडून वर्गणीच्या स्वरूपात शिधा गोळा करतात,व भोजन सोहळा आयोजित करतात, जेवण करायला आयोजक मंडळी हे सर्व जाती, पंथ च्या नागरिकांना भोजनासाठी आमंत्रीत करून सदर कार्यक्रम शांततेत पार पडतात, दरवर्षी शांत चित्ताने होत असलेल्या या सोहळ्यास काळिमा फासण्याचे काम सडक्या,कुजलेल्या मानसिक प्रवृतीच्या इसमांनी केले आहे,एका विशिष्ट समुदायला सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याचे कृत केले आहे,पोलीस स्टेशनं सिंदेवाही ला दाखल झालेल्या तक्रारदाराच्या तक्रारी नुसार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ ला संपूर्ण गाव मिळून हनुमान मंदिर येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गोपालकाला व जेवणाचा कार्यक्रम करिता गावातील बाकी समाजवाल्याकडून वर्गणी काढून ठरविलेला होता.मी कार्यक्रमाकरिता शिधा दिला होता. दिवसभर कार्यक्रम सुरु होता.सायंकाळी जेवणाचा कार्यक्रम असल्याने गावकरी लोकांनी आम्हा महार समाजवाल्यांना त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केले होते.त्यामुळे मी व माझे गावातील लोक सायं.६:०० ते ७:०० वाजताच्या दरम्यान गावातील हनुमान मंदिर येथे जेवण करण्याकरिता गेलो होतो.गिरीधर मारोती गुरुनुले व वाल्मिकी देवाजी जेंगठे हे तिथे हजर होते.त्या दोघांनी मला व माझ्या समाजवाल्यांना हे महारे कशाला जेवाला आले असे म्हणून जेवण वाढत असणारे विशाल नेपाल सहारे,प्रतिम गौतम भैसारे या मुलांना सुद्धा तुम्ही महारे कशाला वाढता असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून अपमानीत केले.व आम्हांला दमदाटी केली.त्यामुळे गिरीधर मारोती गुरुनुले व वाल्मिकी देवाजी जेंगठे या दोन निच मानसिकतेच्या व्यक्ती विरोधात कन्हाळगाव येथील समाजबांधवानी सिंदेवाही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली असून त्यांचे विरोधात अनु.जाती आणी अनु.जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार कलम 3(1)(r),3(1)(s) व भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 अन्वये कलम 352 याप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे,पण सिंदेवाही तालुक्यात असे कुजलेल्या व सडलेल्या मानसिक प्रवृतीचे व्यक्ती जो पर्यन्त आहे तो पर्यंत जातीवाद उफाळून येतच राहील, आचार सहिंता मध्ये शांतता व सुव्यस्था भंग करणे, दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणे ही कलमे सुद्धा या नमूद करण्यात यावी,त्यामुळे अश्या जातीवादी असलेल्या ना धडा मिळेल, सदर प्रकरणात आणखी पुन्हा कलम
वाढ होणार कि नाही हे पोलीस प्रशासनाच्या तपासात दिसून येईलच. पुढील तपास व कारवाई सुरु आहे……

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
