हेल्मेट वापरा अन्यथा दंड भरण्यासाठी तयार रहा!::सिंदेवाही पोलीस*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

सिंदेवाही :: दुचाकी गाडी चालवीत असनांना हेल्मेट वापरण्याचे शासनाचे आदेश असतांना ही बरेच नागरिक या आदेशाकडे काना डोळा करीत असतात, रहदारी च्या रस्त्यावर भरधाव वेगाने कर्कश आवाज करीत गाडी चालवीने असे प्रकार आजच्या तरुणाईची फॅशन बनली आहे, अश्या फॅशन च्या नावाखाली होत असलेल्या प्रकारा मुळे अपघात चे प्रमाण वाढत आहे, भर वेगाने गाडी चालवीत असणारे आपल्या जीवाला मुकतातच पण रस्त्यावर चालणाऱ्या निरपराध व्यक्तीच्या जीव खेळण्याचे काम करतात, रस्त्यावर होत असलेल्या अपघात ला कारणीभूत दुचाकी चालवीत असतांना हेल्मेट न वापरणे हे सुद्धा एक कारण आहे, त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शन खाली जिल्हातील कलम 129 अन्वये मो वा का नुसार विना हेल्मेट दुचाकी चालवीत असणाऱ्या वर सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून कडक कारवाही करण्याचे आदेश सिंदेवाही पोलीस स्टेशनं प्राप्त झाले असून दिनांक 28 नोव्हे पासून विना हेल्मेट दुचाकी चालवीणाऱ्या वर कारवाही करण्यात येईल,तरी दुचाकी चालवीत असणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट वापरावे अन्यथा कारवाही साठी तयार रहा असे आव्हान सिंदेवाही पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांना केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
