नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , प्रियंवदा येथे भारतीय संविधान गौरव दिन थाटात*  —————————————- *भारतीय संविधान रॅलीच्या आयोजनातून नागरिकात जनजागृती – जनता टाइम्स न्यूज

प्रियंवदा येथे भारतीय संविधान गौरव दिन थाटात*  —————————————- *भारतीय संविधान रॅलीच्या आयोजनातून नागरिकात जनजागृती

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*प्रियंवदा येथे भारतीय संविधान गौरव दिन थाटात*

—————————————-

*भारतीय संविधान रॅलीच्या आयोजनातून नागरिकात जनजागृत

*26 नोव्हेंबर 2024*

*जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेल*

*इंसाफ चाहता है! इंडिया*

*रत्नपाल मेश्राम :-कारगाव सर्कल प्रतिनिधी*

सालेशहरी:-भिवापूर तालुक्यातील प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ला सकाळी अकरा वाजे भारतीय संविधान गौरव दिनाचा औचित्य साधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव ,युगप्रवर्तक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवा महामानवाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करत भारतीय संविधान दिनाचे गुणगौरव प्रित्यर्थ त्रिवार वंदन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय राजू शिवणकर सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा प्रवक्ते म्हणून प्रदीप लोखंडे सर ,विनोद ननावरे सर राजू सागरे सर, फुलचंद ठाकूर सर, भारत शेंडे सर, दुर्गा रडके मॅडम, भुजाडे मॅडम आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

यावेळी भारतीय संविधान गौरव दिन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रवक्ते , जेष्ठ शिक्षक प्रदीप लोखंडे सर यांनी भारतीय संविधान, भारतीय संविधानाची निर्मिती, लागलेला कालावधी ,त्यात नमूद असलेले मानवाचे अधिकार तथा कर्तव्य, संविधानाचा गाभा ,त्याची मार्मिकता व उपयोगीता ,समस्त देशाच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या विकासासाठी संविधान कसे महत्त्वपूर्ण आहे यावर त्यांनी आपल्या भाषण शैलीतून प्रकाश पाडले तथा विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे रक्षणासाठी तथा संवर्धनासाठी येतो की येथोचित संघर्ष करण्याचे आवाहन केले.

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य, राजू शिवमकर सर यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून मानवाला सुख, शांती, समृद्धीच्या मार्गाने जगायचे असेल तर भारतीय संविधानाशिवाय तरनोपाय नसल्याचे प्रतिपादन केले.

तसेच विनोद ननावरे सर, राजू सागरे सर ,भारत शेंडे सर ,रडके मॅडम ,तनु मॅडम तथा विद्यालयातील शालेय विद्यार्थिनी प्रमुख कुमारी काजल लांजेवार ,विद्यार्थी प्रमुख म्हणून शिवम कुशवाह ,कुमारी रागिनी मलोडे आदींनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी केलेले अर्थक परिश्रम त्याग समर्पण हालअपेष्टा तथा संविधानाचे मानवी कल्याणासाठी असलेले महत्व यावर प्रकाश पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप लोखंडे सर ,सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक विलास तांबे सर तथा कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फुलचंद ठाकूर सर यांनी केले.

यावेळी संविधानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी तसेच सर्वसामान्य जनतेत व नागरिकात जनजागृती होण्यासाठी संविधानाची रॅली काढण्यात आली व संविधानाच्या गुणगौरवासाठी तथा त्याच्या पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी नारे व जयघोष करण्यात आले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सौ मंडपे ताई, देवराव भोयर, वामन वानखेडे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now