नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , खुमारी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी – जनता टाइम्स न्यूज

खुमारी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*खुमारी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी*

राजु कापसे प्रतिनिधी

रामटेक :- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुमारी येथील चौक ओलांडत असलेल्या दुचाकीला नागपूरहून जबलपूरकडे येणाऱ्या ट्रकने उडवून त्याला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याने दुचाकीवरील पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नागपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र वाटेतच प्रकाश नारनवरे यांचा मृत्यू झाला. तर मौसम प्रकाश नारनवरे वय २१ हा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खुमारी चौकात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरी बिजेवाडा येथे राहणारे पिता-पुत्र यांची बोरडा गावात शेती आहे. शुक्रवारी शेतात भात कापणी व उचल आटोपून दोघेही त्यांच्या एमएच 40 सीडब्ल्यू 4043 क्रमांकाच्या दुचाकीने घरी परतत होते. ते खुमारी चौकात पोहोचले असता नागपूरहून जबलपूरच्या दिशेने भरधाव वेगात येणारा ट्रक क्र.RJ 11 GC 6852 ने मोसमच्या दुचाकीला धडक दिली. ट्रक चालकाने धडक टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान, ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यामुळे दुचाकीस्वार पिता-पुत्र जबर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले. मात्र वाटेतच वडील प्रकाश यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. रामटेक पोलीस अधिक तपास करत आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed