नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मरणानंतरही सुटका नाही, विसाव्याभोवती कचराच कचरा – जनता टाइम्स न्यूज

मरणानंतरही सुटका नाही, विसाव्याभोवती कचराच कचरा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*मरणानंतरही सुटका नाही, विसाव्याभोवती कचराच कचरा*

राजु कापसे प्रतिनिधी

रामटेक :- एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराप्रसंगी पार्थिव स्मशानभूमीत नेण्यापूर्वी पार्थिवाला चौरस्त्यावर विसावा द्यावा लागतो. ही एक परंपरा आजही कायम आहे. रामटेक तालुक्यातील देवलापार येथे बनवलेला विसावा ओटा हा पूर्णपणे कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

मरणानंतरही मृत व्यक्तीच्या यातना कमी झालेल्या नाहीत.ओट्या सभोवताली संपूर्ण हिरवीगार झाडे बहरली आहेत. या कारणाने आता पार्थिवाला रस्त्यावर ठेवण्याची वेळ आलेली आहे. देवलापार येथे विसावा ओटा सिमेंट बनलेला आहे. त्यावर पाण्याच्या बचावाकरिता बसवलेल्या टिनाचा पत्रासुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे.कधीही तुटून पडण्याची शक्यता आहे. मुख्यतः हा विसावा ओटा पूर्णपणे कचऱ्यामध्ये आहे. मधात ओटा आणि भोवती पूर्ण झाडेझुडपे अशी अवस्था या विसाव्याची झाली आहे. याकडे मात्र ग्रामपंचायतीचे सातत्याने दुर्लक्ष दिसून येत आहे. गावात एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यास आणि त्याला अंत्यविधीसाठी नेत असल्यास त्या पार्थिवाला विसावा द्यावा तर द्यावा कसा, असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहेत. अशा काही सामाजिक समस्या गावात आहेत. मात्र, या समस्यांचे निराकरण करण्यात लोकप्रतिनिधी मात्र असमर्थ ठरत आहेत.

*काही नेत्यांनी दिले होते आश्वासन*

या स्मशान भुमीचे संदर्यीकरण व साफसफाई करण्याचे आश्वासन स्थानिक बड्या नेत्याने दिले होते परंतू ते आश्वासन केवळ आश्वासनच राहिले. या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देण्यास कोणाही तयार नाही हे विशेष.गेल्या चार-पाच वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे.यावरून नागरीकांच्या प्रती लोकप्रतिनिधी किती जागरूक आहे हे दिसून येते.

या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याचे काम हे लोकप्रतिनिधीचे असून ते कोणाही देत नाही आहे. मेल्यानंतर मृतदेह विसाव्याकरिता ठेवला जातो त्या ओठ्याला कचऱ्याचा विळखा दिसून येत आहे. त्यामुळे मेल्यानंतरही प्रेताला मरन यातनाच सहन कराव्या लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज आहे.

*हेमंत जैन, अध्यक्ष*

*व्यापारी संघटना, देवलापार*

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now