नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वारकरी शिक्षण संस्थे करिता भूमीदान समारंभ ६ ला – जनता टाइम्स न्यूज

वारकरी शिक्षण संस्थे करिता भूमीदान समारंभ ६ ला

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*वारकरी शिक्षण संस्थे करिता भूमीदान समारंभ ६ ला*

राजु कापसे प्रतिनिधी

रामटेक : वारकरी शिक्षण संस्था आळंदी (देहू) येथील वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा रामटेक मध्ये सुरु करण्या करिता भूमीदान समारंभ ६ डिसेंबरला पावन भूमि सोनेघाट येथे सकाळी आयोजित केला आहे. वत्सलाबाई भगवान मेहरकुळे, रेखा देवचंद हटवार आणि देवचंद टिकाराम हटवार हे भूमी दाते आहेत. ते ४ एकर शेती दान देणार आहे.
स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा प्रभू रामचंद्राच्या पवित्र पावन भूमी सोनेघाट,रामटेक या ठिकाणी स्थापन करण्याच्या हेतूने संस्थेकरीता चार एकर भूमीदान समारंभ सोहळा शांतीब्रह्मश्री ह. भ.प.गु. मारुतीबाबा कुरेकर, ह.भ.प. संदीपान महाराज शिंदे अध्यक्ष वा. शि. संस्था, ह.भ.प. रामराव महाराज ढोक विश्वस्त वा.शि. संस्था यांचे शुभहस्ते आणि प्रमोद महाराज ठाकरे,तुकाराम महाराज मुलीक व सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था आळंदी (देहू) आजी माजी विद्यार्थी वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ डिसेंबर रोज शुक्रवार ला आयोजित केला आहे. कार्यक्रम सकाळी ७ वाजता हनुमंतरायाच्या महाभिषेक पासून सुरू होईल. वै. तपोनिधी सिताराम महाराज व स. जोग महाराज यांच्या प्रतीमेसह मंदिरापासून कार्यक्रम स्थळी दिंडी काढण्यात येईल. तिथे या प्रतिमांच पूजन केल्या जाईल. सकाळी १० वाजता ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक (नागपूरकर) यांचे कीर्तन होईल. सकाळी ११ वाजता भूमिदान समारंभ व महाप्रसाद वितरण केल्या जाईल. या सोहळ्याचे आयोजन सोनेघाट चे ग्रामस्थ,रामटेक परिसरातील भाविक मंडळी आणि वारकरी संप्रदाय करीत आहे. विशेष म्हणजे आळंदी, पंढरपूर नंतर भारतातील रामटेक हे तिसरे स्थान ठरणार आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed