रामटेक येथे बाबासाहेबांना रक्तदानातून मानवंदना

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*रामटेक येथे बाबासाहेबांना रक्तदानातून मानवंदना*
प्रतिनिधी: रामटेक. दिनांक: ६/१२/२०२४
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामटेक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात #ब्लड फॉर बाबासाहेब अभियान अंतर्गत आकाशझेप फाउंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान, भारतीय बौद्ध महासभा, रिहान मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व मनाम एकता मंच दुकानदार संघ यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय समाजातील तरुणांनी रक्तदानातून बाबासाहेबांना मानवंदना देत ६१ व्यक्तींनी मानवता, राष्ट्रीय एकता व सामाजिक समतेचा कृतीशील संदेश दिला.
रीआन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप बोरकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रफुल अंबादे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले. यावेळी प्रवीण साठवणे, मनीष खोब्रागडे, राजन सांगोडे, अमित अंबादे, पंकज माकोडे, मयंक मेश्राम, महादेव सरभाऊ, संजय मेश्राम, दीपा चव्हाण, शुभा थुलकर, सुमेध गजभिये, नंदकिशोर कुंभरे, पुरुषोत्तम हटवार, प्रशांत डहारे, हे प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात ग्यानी बाराई, रमेश धनसानिया, पलाश खोब्रागडे, विजय फुलबांदे, पंकज सुखदेवे, मयंक मेश्राम, डॉ. प्रदीप बोरकर, असलम जलील, दीपक वाहने, अनिकेत चौधरी, प्रणय रामटेके, राजेश गजभिये, अतुल साठवणे, कुणाल धमगाये, विकास भवते, पुरुषोत्तम हटवार, मनोज डोंगरे, आशिष धूमरेश्वर, राहुल बोंबले, डॉ. प्रकाश गणवीर, विजय पंधरे, राकेश चौरे, गौरव रामटेके, श्याम रामटेके, धम्मपाल सोनकुसरे, प्रवीण चकोले, पृथ्वीक डोंगरे, निशांत खोब्रागडे, अश्विन ऊके, संतोष बेनीबांगडे, राजेश सांगोडे, राकेश पारधी, राहुल शेंडे, अभिषेक सांगोडे, देवानंद गेडाम, अमित नागरे यांनी तसेच श्यामकुमार रहाटे ४२ व्यांदा, साक्षोधन कडबे यांनी ३६ व्यांदा रक्तदान केले हे येथे उल्लेखनीय आहे. यावेळी लाईफ लाईन रक्तपेढीचे पीआरओ प्रवीण साठवणे, मिताराम हटवार, भूषण देशमुख, ऋतिक बागडे, रीता सराफ, शुभांगी खोब्रागडे, सुजाता अंबादे, फिरदौस अन्सारी यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
