अंबाळा येथील लक्ष्मी नारायण मंदिरात श्रीराम जानकी विवाह सोहळा उत्साहात साजरा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

अंबाळा येथील लक्ष्मी नारायण मंदिरात श्रीराम जानकी विवाह सोहळा उत्साहात साजरा
रामटेक दि.07.12.24
अंबाळा येथील लक्ष्मी नारायण मंदिरात श्रीराम जानकी विवाह सोहळा उत्साहात साजरा
रामटेक : रामटेक स्थित प्रशिद्ध अंबाळा येथील लक्ष्मी नारायण मंदिर स्वामी सीतारामदास महाराज आश्रमधे 6 डिसेंबरला सायंकाळी राम- जानकी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे रामजानकी विवाह सोहळ्याची सुरुवात महान संत स्वामी योगीराज सीतारामदास महाराज यांनी केली होती. तेव्हापासून हा विवाहसोहळा सुरू अखंड चालू आहे.
5 डिसेंबरला सकाळी 11 वाजता संगीतमय अखंड रामायण सुरू झाले. यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
6 डिसेंबरला सकाळी 11 वाजता अखंड रामायणची समाप्ति झाली. सायंकाळी गडमंदिरात रामजींचा अभिषेक झाला आणि गडमंदिरातून रामजींची बारात अंबाळा करिता निघाली. अंबाला प्रवेशद्वारावर बारात चे जंगी स्वागत करण्यात आले.
यानंतर राम जानकीचा विवाह झाला. विवाह समारोह यशस्वीतेसाठी योगराज सीतारामदास महाराज ट्रस्टचे संचालक व भक्तांनी प्रयत्न केले. मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. लग्नानंतर पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
