जोपर्यंत प्रश्न करणार नाही तोपर्यंत विज्ञान शिकता येणार नाही—-मा. आमदार संजय मेश्राम यांचे प्रतिपादन* ————————————– *राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उद्घाटन सोहळा थाटात*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

जोपर्यंत प्रश्न करणार नाही तोपर्यंत विज्ञान शिकता येणार नाही—-मा. आमदार संजय मेश्राम यांचे प्रतिपादन*
————————————–
*राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उद्घाटन सोहळा थाटात
*दिनांक 10 डिसेंबर 2024*
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*इन्साफ चाहता है! इंडिया*
*भिवापूर उमरेड प्रतिनिधी:- कु. काजल तांबे*
*भिवापूर तालुका प्रतिनिधी*:-‘विज्ञान कसा घडत असतो? हे प्रश्न निर्माण केल्याने होऊ शकते. जोपर्यंत प्रश्न करणार नाही तोपर्यंत विज्ञान शिकता येणार नाही’असे मार्मिक प्रतिपादन उमरेड विधान सभा मतदार संघाचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार माननीय संजयजी मेश्राम साहेब यांनी राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथे दिनांक 10 डिसेंबर 2024 ला सकाळी 11 वाजे येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पंचायत समिती भिवापूर चे सभापती मा. सौ माधुरीताई देशमुख, विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती भिवापूरचे उपसभापती मा. राहुल मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य सौ.नेमावलीताई माटे ,पंचायत समिती सदस्य सौ सदस्य ममता शेंडे ,पंचायत समिती सदस्य के .जी . घोडेस्वार, नॅशनल एज्युकेशन सोसायटी भिवापूर चे सचिव श्रीमती लतीफा कुरेशी मॅडम, गटशिक्षणाधिकारी विजय जिडगिलवार सर, गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव सर, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप गुप्ता, राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य मा.इमरान शेख सर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की ‘तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिका, कोणी सांगितले म्हणून विश्वास ठेवू नका .शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनो तुम्ही लक्ष सेट करा यश हमखास तुमच्या पदरी पडेल हे निर्वादीत सत्य आहे’ असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले.
विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंचायत समिती शिक्षण विभाग च्या सौजन्याने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी येथे आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी मा.आमदार संजय मेश्राम साहेब यांच्या हस्ते नुकतेच इंग्रजी या विषयात पीएचडी हा सर्वोच्च बहुमान संपादित करणारे शिक्षक चांदोरे सर यांच्या पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी विचार मंचावरील नॅशनल एज्युकेशन संस्थेचे सचिव सौ कुरेशी मॅडम यांनी छोट्या छोट्या संशोधनातून बाल वैज्ञानिक आणि पुढे समाज हितकारक वैज्ञानिक बनण्यास वाव मिळवून देण्यास तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी अत्यंत प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच विचार मंचावरून पंचायत समिती भिवापूर उपसभापती राहुल मेश्राम साहेब, पंचायत समिती सदस्य के जी घोडेस्वार, कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ माधुरीताई देशमुख आदी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना येथोचित मार्गदर्शन करून विज्ञानाची कास ठेवून जीवनाला अधिक समृद्ध बनविता येत असल्याचे सांगितले.
सदर विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातील सर्व प्राथमिक ,माध्यमिक ,शिक्षक गट, प्रयोगशाला परिचर गट आदि स्तरातून जवळपास 70 ते 80 मॉडेल्स सादर करण्यात आले होते.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी साठी शास्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयावर आधारित सात उप विषयावर वैज्ञानिक प्रतिकृती सादर करण्याचे नियोजित केले होते.
सदर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन गटशिक्षणाधिकारी विजय जिडगिलवार ,शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के ,तथा प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी ऋग्वेद भांडारकर सर आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
यावेळी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षक तसेच विज्ञान प्रदर्शनीचा लाभ घेण्यासाठी भिवापूर शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विजय जिडगीलवर सर, सूत्रसंचालन विद्यालयातील पर्यवेक्षक फारूक शेख सर तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख पिल्लेवान सर यांनी केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
