नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रियंवदा येथील एल. ए. गटात राजू सागरे तालुक्यात अव्वल स्थानी*  —————————————- *प्रियंवदाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत मारली बाजी*  – जनता टाइम्स न्यूज

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रियंवदा येथील एल. ए. गटात राजू सागरे तालुक्यात अव्वल स्थानी*  —————————————- *प्रियंवदाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत मारली बाजी* 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रियंवदा येथील एल. ए. गटात राजू सागरे तालुक्यात अव्वल स्थानी*

—————————————-

*प्रियंवदाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत मारली बाजी*

*दिनांक 11 डिसेंबर 2024*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

*इंसाफ चाहता है इंडिया*

*मुख्य पत्रकार महाराष्ट्र:-सौ अर्चना लोखंडे*

नागपूर प्रतिनिधी:-नुकतेच दिनांक 11 डिसेंबर 2024 ला राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी ता. भिवापूर, जि. नागपूर येथील राजू मनोहर सागरे यांच्या जलशुद्धीकरण प्रकल्प या वैज्ञानिक प्रतिकृती ला प्रयोगशाला परिचर गटातून तालुक्यात अव्वल स्थान( प्रथम क्रमांक) प्राप्त झाल्याने विद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

विशेष म्हणजे चालू शैक्षणिक सत्रात राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथे शिक्षण विभाग पंचायत समिती भिवापूर च्या वतीने तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन दिनांक 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर यादरम्यान करण्यात आले होते. यात तालुक्यातून प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक गट तथा प्रयोगशाला परिचर गट या सर्वा मिळून जवळपास 125 वैज्ञानिक प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यात आले होते. यात विज्ञान पद्धतीने चा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान तथा या मुख्य विषयांतर्गत एकूण सात उपविषय निश्चित करण्यात आले होते. यात अन्न आरोग्य व स्वच्छता, वाहतूक व दळणवळण, नैसर्गिक शेती, गणितीय मॉडेल्स, आपत्ती व्यवस्थापन, संगणकीय माहिती तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षण व कचऱ्याची विल्हेवाट असे निर्धारित विषय होते.

यात प्रामुख्याने प्रयोगशाला परिचर गटातून प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी येथील प्रयोगशाला परिचर राजू मनोहर सागरे यांनी अथक परिश्रमातून टाकाऊ पासून टिकाऊ व अत्यल्प खर्चात तयार केलेल्या व जीवनापयोगी ठरलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प या प्रतिकृतीला झालेल्या मूल्यांकनात परीक्षक मंडळाने प्रथम स्थान स्थानावर निवड केली तथा या यंशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मा. विजय जिडगिलवार सर तथा त्यांच्या शिक्षण विभागातील समस्त चमुने त्यांचे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह तथा सन्मानपत्र देऊन गौरव केला व पुढील भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्यात.

यात प्रामुख्याने शिक्षण विस्तार अधिकारी मा. ऋग्वेद भांडारकर सर यांनी जिल्हास्तरावर सदर वैज्ञानिक प्रतिकृती यशस्वी ठरण्यासाठी त्या प्रतिकृती वर अधिक परिश्रम करून तिला अधिक आकर्षक तथा वैशिष्ट्यपूर्ण कसे करता येईल यावर भर देण्याचा सल्ला दिला आणि मिळालेल्या यशाबद्दल राजू सरांचे अभिनंदन केले.

यावेळी विचार मंचकावर अध्यक्षस्थानी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे सचिव सौ. लतीफा कुरेशी मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी विजय गडगिलवार सर, राष्ट्रीय विद्यालय भिवापूर चे प्राचार्य मा. इमरान शेख सर, शिक्षण विस्तार अधिकारी मा. ऋग्वेद भांडारकर सर, केंद्रप्रमुख श्री पिल्लेवान सर, गोमकर सर, राष्ट्रीय विद्यालय भिवापूर चे पर्यवेक्षक श्री फारुक शेख सर ,विज्ञान परीक्षक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभागी झालेल्या विद्यालयातील राजू मनोहर सागरे सरांसह माध्यमिक गटासाठी रोशन बोरकर, सौम्य फुलचंद बागडे, हिमांशू डडमल , कु.आशु प्रवीण शेंडे, कु. कशिश दहीलकर आदि सहभागी बालवैज्ञानिकांचे विद्यालयाचे प्राचार्य मा. राजू शिवणकर सर ,संस्थेचे विश्वस्त मा. राकेश उमरेडकर सर ,विद्यालयाचे गणित शिक्षक श्री राजू तांबे सर, विनोद ननावरे सर ,तन्नू मॅडम ,रडके मॅडम ,भुजाडे मॅडम, भारत शेंडे सर , फुलचंद ठाकूर सर, विजय सहारे सर ,सौ मंडपे ताई ,देवराव भोयर, वामन वानखेडे आणि विज्ञान शिक्षक प्रदीप लोखंडे सर आदींनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.

विज्ञान प्रदर्शनीत यशवंत ठरलेले राजू सागरे सर यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक प्रदीप लोखंडे सर तथा विद्यालयातील सहभागी विज्ञान प्रतिकृती धारक विद्यार्थ्यांना दिले.

तसेच विद्यालयातील समस्त विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशाबद्दल राजू सरांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed