सामाजिक कार्यक्रमात कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जनहित फॉउंडेशन चे निवेदन
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

सुनिल गेडाम मुख्य पत्रकार जनता टाइम्स
सिंदेवाही ::”केल्यानी होता आहे रे आधी केल्याची पाहिजे ” सहज सोपी असलेल्या या ओळी मध्ये खुप काही दडलेल आहे पण या ओळीचा अर्थ काही बुद्धिवंत समजू शकतात आणि पुढाकार घेऊन कार्य करतात, आणि त्यांच्या फक्त एका निवेदन ची दखल शासन प्रशासन पेक्षा सामान्य नागरिक घेतात व त्यावर आपले मनोगत देत असतात त्याचा एक वेगळाच आनंद असतो, झाडीपट्टी भागात शेतीचा हंगाम संपला असून आत्ता सिंदेवाही तालुक्यातील बरेचश्या गावात शंकर पटाचे नियोजन होते, शंकरपटाला जत्रेच स्वरूप येत, या शंकरपटा मध्ये वेगवेगळ्या प्रकारे दुकान लागतात, सदर शंकरपटा संपल्या नंतर तिथं पडलेला घन कचऱ्या चे व्यवस्थापन करण्यासाठी पट भरविणारी कमेटी सुद्धा कुठलही व्यवस्थापन करीत नसल्याने सदर कचरा कित्येक दिवस तसाच पडून राहतो पण त्याची विल्हेवाट कुणीच लावत नाही, आणि तो लावण्याचा कुणीही विचार करत नाही, मौजा वासेरा मधील काही सुजाण व बुद्धिवंत असलेल्या सुशिक्षित मुलांनी समाज हितासाठी जनहित फॉउंडेशन ची स्थापन केली,जनहित फॉउंडेशन दर वर्षी समाज हिताचे कार्यक्रम करीत असतो,या वर्षी आपल्या सामाजिक कर्तव्य ची जाण ठेऊन जनहित फॉउंडेशन ने शंकर पटात होत आपलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासन निवेदन दिले, सदर निवेदन मध्ये प्रशासनला जाणीव करून दिली कि ग्रामीण भागातील गावांमध्ये अर्थातच झाडीपट्टीत माहे-जानेवारी,फेब्रुवारी,मार्च व इतर महिन्यात मंडई व बैलांच्या जंगी इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात येते.त्याच निमित्ताने नाटकांचे सुद्धा आयोजन करण्यात येते.अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या सार्वजनिक समारंभातून खर्राच्या प्लास्टिक,पाणी बाटल, ओला कचरा,सुखा कचरा,यासारख्या कचऱ्याची निर्मिती होते.मात्र यावर नियंत्रणासाठी व कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी संबधित आयोजकांनी करायला पाहिजे.पण तसे होतांना दिसत नाही.सदर कार्यक्रमांच्या परिसरात कचरा हा तसाच पडलेला असतो नंतर तो नैसर्गिक वाऱ्याने उडून कुठल्याही शेतजमिनीत व जंगल परिसरात,गावाशेजारी जातो.त्यामुळे शेत जमिनीला,जंगल परिसरातील प्राण्यांना,मानवाच्या आरोग्याला सुद्धा त्याचा धोका आहे.तेव्हा आपण अश्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देतांना परवानगी पत्रात कचरा व्यवस्थापनासाठी सार्वजनिक समारंभात व मंडईत,शंकरपटात लागणाऱ्या दुकानात कचरापेटी व कचरा गाडीची व्यवस्था आयोजकांनी करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारावी अन्यथा त्यांनी उचित कारवाईस पात्र राहतील अशी सक्त ताकीद व परवानगी परिपत्रकात नमूद करून यावर तात्काळ अंमलबजावणी करावी.तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संबधित सर्व ग्राम पंचायत तसेच आपल्या स्तरावरील सर्व विभागांना सूचना व आदेश पारित करावा.असे नमूद केले आहे.निवेदन देतांना प्रामुख्याने आक्रोश खोब्रागडे अध्यक्ष,विशाल गेडाम उपाध्यक्ष,तथागत कोवले सचिव,सत्यपाल मेश्राम,रितेश सूर्यवंशी,वीरेंद्र मेश्राम,किशोर बोरकर व इतर सहकारी उपस्थित होते जनहित फॉउंडेशन ची सामाजिक जान ही प्रशासनस विचार करायली लावणारा मुद्दा उचलून धरल्याने आत्ता नेमक प्रशासन जाग होत कि नाही ते आत्ता बघायचं आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
