शंभर रुपयाचा मुद्रांक सुरु करा —– सम्राट अशोक सेनेची मागणी* ———————————– *सम्राट अशोक सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*शंभर रुपयाचा मुद्रांक सुरु करा —– सम्राट अशोक सेनेची मागणी*
———————————–
*सम्राट अशोक सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेद*
*दिनांक:-13 डिसेंबर 2024*
*जनता टाइम्स जटा टीवी चॅनेल*
*इन्साफ चाहता है! इंडिया*
*मुख्य पत्रकार महाराष्ट्र:- सौ. अर्चना लोखंडे*.
नागपूर प्रतिनिधि:-नुकतेच राज्य शासनाने महसूल विभागातील विविध लेखी कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या शंभर रुपयाचा मुद्रांकावर बंदी आणून त्या ऐवजी 500 रुपयांचा मुद्रांक महसुलातील विविध लेखी काम काजकरिता लागु करण्याचा शासन निर्णय काढून राज्यातिल गोरगरिबांची झोपच उडवून दिली असल्याने सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना एका लेखी निवेदनातून या जनहित विरोधी शासन निर्णयावर फेरविचार करून सदर शासन निर्णय रद्द करावा आणि पूर्ववत नेहमी प्रमाणे शासकिय कामकाजात वापरात असलेला शंभर रुपयाचा मुद्रांक शासकिय कामात नियमित करण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे दैनंदिन व्यवहारात अनेक शासकीय कामकाजात भारतीय मुद्रंकाचा लेखी कामासाठी वापर केला जातो. यात प्रामुख्याने महसूल , शिक्षण, बँकिंग, पतसंस्था, स्थानिक स्वराज्य संस्था,विवाह नोंदनी, न्यायपालिका ,घरभाडे करारनामा, आदि क्षेत्रात प्रतिज्ञापत्र, शपथ पत्र, संमती पत्र , सामंजस्य करार यासाठी मुद्रांक पेपर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मात्र जनहित लक्षात न घेता एकाएकी राज्य शासनाने जाचक नियम काढून 100/ रुपयाचा मुद्रांक बंद करून त्या ऐवजी 500/ रुपयाचा मुद्रांक पेपर सुरु करण्याचा शासन निर्णय काढून राज्यातील गोरगरिबांची झोपच उडवून दिल्याने सदर शासन निर्णय रद्द करुन पूर्ववत 100/ रुपयाचा मुद्रांक पेपर कायम कऱण्यात यावा अशी मागणी सम्राट अशोक सेना या राजकिय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.तुळशीदास गेडाम यांनी एका लेखी निवेदनातून मागणी केली आहे.
लोकशाही शासन व्यवस्थेत लोकहिताचे अनेक निर्णय घेणारा सरकार अचानक गरिबांवर आर्थिक भूकंप लादणारा सरकार अशी प्रतिमा कसे काय निर्माण करु शकतो? अशी प्रतिक्रीया जनमानसात उमटत आहे.
वेळीच योग्य निर्णय घेउन गोरगरीब जनतेसाठी परवडेल,त्यांना झेपेल असा सहानुभूतीपूर्वक फेरविचार करून सदर शासन निर्णय तात्काळ रद्द करुन जनहिताच्या योजना राबविणे यावर भर द्यावा आणि गोरगरीब ,कष्टकरी, शेतकरी, शेत मजूर सामान्य जनतेला न्यायदान करावा अशी मागणी तुळशीदास गेडाम तथा सम्राट अशोक सेनेच्य सर्व पदाधिकारी रॉबिन सु खरात, सदानंद नी. रंगारी, शेखर मो. खोब्रागडे ,सुधीर ल मते , अमरकंट बांडेबुचे, अशोक ढोके, नामदेव मेंढे,डॉ. अमृत बांडेबुचे , नवनीत टेंभुर्णे आदींनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
