जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा पांजरा ने मुंडीकोटा केंद्रातून गोंडीनृत्यावर तालुक्यात केला धमाल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा पांजरा ने मुंडीकोटा केंद्रातून गोंडीनृत्यावर तालुक्यात केला धमाल
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
अटल क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवात जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा पांजरा ने मुंडीकोटा केंद्रातुन गोंडीनृत्य सादर केला त्यात जिल्हा प. उच्च प्राथ. शाळा पांजरा यांनी तालुक्यात सुरु असलेल्या अटल क्रीडा व सांस्कृति महोत्सव कार्यक्रमात धमाल केला असुन नृत्याने सर्वांचे मन मोहून घेतलं
त्याच बरोबर जल, जंगल, जमीन यांचे संरक्षण करा, झाडे लावा झाडे जगवा असा या नृत्यातून आदिवासी वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांनी जनतेला संदेश दिला.
वसुंधरेचा ठेवा जपुनी, राखू श्रुष्टीचा सन्मान !
निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही, आदिवासी म्हणून आम्हा आहे अभिमान !.
अतिशय सुंदर असा नृत्य तालुक्यात सादर केल्याने सर्व शिक्षक वृंदाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच, गावकऱ्यांच्या वतीने आभार माणण्यात आले त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रणोती महेंद्र नंदागवळी, उपाध्यक्ष हिराकुमार गोमासे, सरपंच सौ. शारदा राजेंद्र चामट, उपसरपंच सुभाष चव्हाण, राजेंद्र चामट, सौ. निरंजना विजय उपासे, गणेश चव्हाण, पालक विजय उपासे, प्रकाश गुरव, महेंद्र नंदागवळी, ग्रा.पं.सदस्य महेश गाढवे, रवी फुलझले, आशिष मडावी, संदीप मडावी, शैलेश मडावी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांजराचे मुख्याद्यापक हाके सर, स. शिक्षक वासनिक, सहारे सर, बोन्दरे मॅडम, गाढवे बाई, आस्वले बाई, अंकित बावनकर, निशांत संतापे, संजय कांबळी, मधुसूदनजी मालेवार, पालक वर्ग, सर्व ग्राम पंचायत सदस्य, शाळा समितीचे सर्व सदस्य, गावकरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
