ना. गडकरींच्या हस्ते रामधाम येथील सुवी बर्ड पार्क चे भुमिपुजन रामटेक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

ना. गडकरींच्या हस्ते रामधाम येथील सुवी बर्ड पार्क चे भुमिपुजन
रामटेक -:
रामधाम येथील ‘ सुवी बर्ड पार्क ‘ चे काल दि. २१ डिसेंबर ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते थाटात भुमीपुजन झाले. यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, मुलगा गौरव चौकसे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
मनसर येथील प्रख्यात रामधाम येथे संस्थापक चंद्रपाल चौकसे हे आपल्या कल्पकतेतुन पर्यटकांच्या मनोरंजनाच्या हेतुने विविध बाबी उभारत असतात. त्यांनी रामधाम येथे विविध देवी देवतांचे दर्शन, ओम, मुलांच्या खेळण्याचे साहित्य तथा वॉटर पार्क ची व्यवस्था केलेली आहे. त्यालाच जोड म्हणून सुवी बर्ड पार्क चे सुद्धा काल दि. २१ डिसेंबर ला भुमीपुजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, पंचायत समिती सदस्य कलाताई ठाकरे, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, माजी न.प. उपाध्यक्ष आलोक मानकर, पप्पु यादव, उमेश पटले यांचेसह नागरीक उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
