नारायण टेकड़ी येथे नारायण स्वामी पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

- *नारायण टेकड़ी येथे नारायण स्वामी पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन*
*रामटेक* -:
प्रसिद्ध धार्मिक स्थळ रामटेकच्या अंबाळा येथील नारायण टेकडीवर श्री सद्गुरू नारायण स्वामी व श्री दत्तगुरू बालयोगी छोटूबाबा यांच्या ९ दिवसीय पुण्यतिथी महोत्सव १८ डिसेंबर पासुन सुरू झालेला आहे. तो २६ डिसेंबर पर्यंत राहाणार असुन यादरम्यान येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे.
सुश्री साध्वीजी महाराज यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात झाली. येथे पाचशे वर्षा पूर्वीची सद्गुरू नारायण स्वामीची संजीवनी समाधी आहे. १८ ते २६ डिसेंबरदरम्यानच्या या महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केल्या जात आहे. प्रत्येक दिवसी सकाळी ९ वाजता समाधी अभिषेक, ९ दिवस ओम नमो नारायणाचा संगीतमय अखंड नामजप तसेच सकाळी ११ वाजता भाविकांसाठी निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. या प्रत्येक दिवसी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत महाप्रसाद राहात असतो. विशेष बाब म्हणजे महोत्सवात सेवक स्वतः महाप्रसाद तयार करतात. नऊ दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे २६ डिसेंबरला गोपालकाल्याने समारोप होईल. महोत्सवात जिल्ह्यासह राज्यातून, इतर राज्यातून संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने साधक भाविक भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात. आयोजनासाठी सुश्री साध्वीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात हजारों साधक प्रयत्नरत राहतात.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
