रानटी डुक्कर च्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभाग कडून 70 रुपयाची भरगोस मदत
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*
*मदतीबद्दल वन विभागाचा जाहीर सत्कार करण्याची लाभार्थी ची घोषणा*
सिंदेवाही :: साधारणतः चार ते पाच महिन्या अगोदर मौजा वाकल मधील पुरुषोत्तम मेश्राम हे आपल्या शेळ्या ना घेऊन शेतात चारन्यासाठी नेहमी प्रमाणे नेत होते, पण अचानक एक दिवस
शेळ्या शेतात नेत असतांना रानटी डुक्कर ने अचानक पुरुषोत्तम मेश्राम यांच्या वर हल्ला चढवत गंभीर जखमी केले, जखमी झाल्यानंतर सदर घटनेची माहिती वन विभागाला दिली वन विभाग कर्मचारी नी तत्परता दाखवत दवाखान्यात उपचारासाठी भरती केले, जखमी झाल्याने सदर व्यक्तीला जबरदस्त मार लागल्याने तब्बल आपले काम सोडून दोन ते तीन महिने घरी बसून होता, घरचा कर्ता व कमवता व्यक्ती जर घरी बसत असेल तर त्या परिवार ची स्थिती कशी झाले असेल हे आपण ही समजू शकतो पण अश्याही परिस्थिती मधून वाट काढत आपल्या परिस्थिती शी दोन हाथ करीत जगत होते, जेव्हा उपचार घेऊन बरे झाल्या नंतर वन विभाग कडे आर्थिक मदतीसाठी अर्ज केला, आर्थिक मदत मिळेल अशी आशा होती, जखमी होऊन
दोन ते तीन महिने घरी बसून आर्थिक अडचण सोसून वन विभागाने जी मदत पाठविली ती रक्कम बघून लाभार्थी व्यक्ती ची शुद्ध च हरपली,रानटी डुक्कर नी केलेल्या हल्यात जखमी होऊन दोन ते तीन महिने घरी बसून राहिल्याचा वन विभाग ने सदर व्यक्ती च्या नुकसान भरपाई ची त्याच्या बँक खात्यात जमा केली ती
रक्कम होती 70 रुपये, ही रक्कम मिळाल्यावर लाभार्थी नी जाहीर वन विभागा प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या गावात त्यांचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
