नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर एका अज्ञात भरदाव वाहनाने मादी बिबट्याला जोरदार धडक दिली

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

आत्ताची सर्वात मोठी बातमी रामटेक वरून येत आहे, नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री मॉईल गोपालनगर परिसरात एका भरदाव वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली अशी प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितूनुसार, नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री मॉईल गोपालनगर परिसरात महामार्ग ओलांडत असतांना एका अज्ञात भरदाव वाहनाने मादी बिबट्याला जोरदार धडक दिली. यात घटनास्थळीच बिबट्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती रामटेक वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहचली व बिबट्याचे शव पुढील प्रक्रियेसाठी रामटेक येथे नेण्यात आले. तपास करून धडक देणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी दिली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
